जून महिना संपला.....जुलै सुरु झाला होता...परंतु पावसाचे आगमन होईल असे वातावरण कुठे नभी दिसत नव्हते. आता जगायचे कसे असा प्रश्न बळीराजाला पडला होता...त्याच्या मनातील आर्त हाकेला जणु साद देत आज दि.11 जुलै रोजी माळशेज परिसरात मायभूची तृष्णा भागविणा-या सरी कोसळु लागल्या...
यातून माझा आनंद या सरिंच्या स्वागताला शब्दरुपाने बाहेर पडला...
पाऊस...
हंबरणा-या पाडसाला तू रे साद दिली
सुस्तावलेल्या मेघांना आज जाग आली
जीर्ण जगण्याला तू रे ओल धाडली
काळ्या ढगांनी आज चिंता गाडली
जड़ मनाला तू रे पंख दिले
मातीच्या सुगंधात तन हलके झाले
निळ्या आभाळी तू रे पक्षी गाण गायले
भरपावसात कागदी होडित फिरावेसे वाटले
रानामधिल सौंदर्याला तू रे साथ दिली
रंगबिरंगी पर्णफुलांना प्रकृती प्रसन्न झाली
ओढ्यातील झुळझुळ पाण्यात तू रे डुबकी मारली
नक्षत्रांच्या पाऊलखुणा जपण्या सृष्टि संचारली
कड़ेकपारीतिल मधुर सुरांना तू रे वाट दिली
भेगळलेली मायभू आज हिरवा शालू पांघरली
सरींमधून जणू आत्मा बनून तू रे बरसला
बळीराजाच्या घामाचा आनंद नभी पसरला
©राजू ठोकळ
9890151513
0 comments :
Post a Comment