वीरांगना झलकारी बाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा शूरवीर इतिहास थोडक्यात जाणुन घेवूयात !
आज २२ नोव्हें वीरांगना झलकारी यांची जयंती! झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या इतिहासातील एक महत्वाचे व कोणत्याही माणसाने वाकून अभिवादन करावे असे नाव!
जन्म -२२ नोव्हें १८३०. वडिलांचे नाव सदोबा सिंग आणि आईचे नाव जमुना देवी ! वीरांगना झलकारी बाई यांचा जन्म भोजला गावात झांसी संस्थानात झाला व पुढे त्यांनी झाशीला आपल्या प्राणाचे अनमोल असे वरदान दिले .
आईच्या मृत्युनंतर झलकारी बाई यांना त्यांच्या वडिलांनी 'मुलासारखे' वाढविले. शस्त्र प्रशिक्षण, घोडसवारी अशी मर्दाना कामे त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवली. याच मुळे पुढे त्या एक उत्तम योद्धा म्हणून प्रसिद्ध झाल्या
१८५७ च्या स्वतंत्र उठावातील झाशीच्या बाजूने लढणाऱ्या झलकारी यांनी एक सामान्य सैनिक म्हणून सुरवात केली. त्या राणी लक्ष्मीबाईच्या महिला सैनिक तुकडीमधून झाशीच्या बाजूने इंग्रजाविरुद्ध लढत होत्या. परंतु त्यांच्या युध्दकौशल्यामुळे व बुद्धिमत्तेमुळे त्यांना राणीने महत्वाच्या निर्णय प्रकीयेमध्ये सामील करून घेतले, तसेच राणीचा सल्लागार म्हणून निवडले.
१८५७ च्या झाशीच्या उठावातील झलकारी बाई यांचे योगदान खूपच मोलाचे ठरले. जनरल Hugh Rose यांनी २३ मार्च १८५७ रोजी ४००० सैन्यांची फौज घेवून झासीवर आक्रमण केले तेव्हा राणी किल्ल्यामध्ये अडकून पडल्या होत्या. त्यांना तेथून सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते. कारण हे युद्ध १० दिवस चालले आणि बंदुकधारी इंग्रज सैन्यापुढे राणीचे सैन्य खचू लागले होते. अशा परिस्थितीत राणीला सुखरूप किल्ल्याबाहेर काढण्याची जबाबदारी झलकारी यांनी घेतली. या परिस्थितीत झलकारी या स्वतः राणी लक्ष्मीबाई बनून युद्ध मैदानात उतरल्या व स्वताला इंग्रजांसमोर राणी लक्ष्मीबाई म्हणत जनरल Rose ला गोंधळात पाडले. याच परिस्थितीचा फायदा घेवून राणी किल्ल्यावरून सुखरूप सटकून बाहेर पडल्या.
या प्रसंगानातर झलकारी बाई यांच्या शूरतेची गाथा संपूर्ण बुंदेलखंड मध्ये स्मृतीत राहिली. झलकारी बाई यांच्या साहसी कार्यामुळे समाजाला केवळ अभिमानाच नाही तर संपूर्ण उत्तर भारतात सांस्कृतिक एकोपा निर्माण होण्यास मदत झाली.
आज आपण सर्व राणी लक्ष्मीबाई चा इतिहास गर्वाने कथन करतो परंतु राणी लक्ष्मीबाईच्या उजवा हात समजल्या जाणाऱ्या झलकारी बाईचे नाव मात्र झासीच्या इतिहासात अभावानेच येते हि मोठी खेदाची बाब आहे.
आज या वीरांगनेला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन करत आहे ! या वीरांगनेला आमचा मानाचा मुजरा !
#झलकारी
0 comments :
Post a Comment