धनगर आरक्षण
भारत सरकारच्या मागासवर्ग आयोगाने OBC ची विविध राज्यातील यादी प्रकाशित केलेली आहे. सदर अहवाल 15 जून 1953 रोजी प्रकाशित झालेला आहे. सदर अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी खालीलप्रमाणे:
1) भोपाळमधील ओबीसींच्या यादीत क्रमांक 20 वर Dhangar अशी नोंद असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायात Shepherds असा स्पष्ट उल्लेख आहे.
2) मुंबई प्रांतातील ओबीसींच्या यादीत 82 नंबरवर Dhangar, Kurbar अशी नोंद असून त्याचा हिंदी अनुवाद धनगर असा दिलेला आहे. यात व्यवसाय म्हणून Cattle Keeping, Cultivation, Forest Labour, Sheep Rearing असा उल्लेख आहे.
3) हैदराबाद स्टेटमधील ओबीसींच्या यादीत 30 नंबरवर Dhangar अशी नोंद असून व्यवसायात Shepherd असा स्पष्ट उल्लेख आहे.
4) मध्य भारताच्या ओबीसींच्या यादीत 28 नंबरवर Dhangar अशी नोंद असून हिंदी भाषांतरात धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. यात व्यवसायात Shepherds असा उल्लेख आहे.
वरील नोंदी बघता Dhangar व Dhangad अशी स्पेलिंगची चूक होण्याचा प्रश्न येत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले धनगर आरक्षण नाट्य हा राजकीय कट असून यातून आदिवासींचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment