जव्हार संस्थानच्या अधिपत्याखालील एक रत्नांची खाण असलेला किल्ला म्हणजे रतनगड होय. या किल्ल्याच्या अंगाखांद्यावर आदिवासी क्रांतिवीर बागडलेले आहेत. अनेकांनी आपले रक्त वाहिलेले आहे. या किल्ल्याचा इतिहास ही आपली अस्मिता आहे. हा आपला स्वाभिमान आपण समजून घेतला पाहिजे. चला तर मग आज या किल्ल्याच्या ऐतिहासिक मूल्याचे वाचन करुयात. येथे दिलेली माहिती ऐकीव माहितीवर आधारित आहे. कदाचित यात ठोस लिखित संदर्भाने काही बदल असू शकतात. परंतु येथील वर्चस्व हे आदिवासींचे राहिलेले आहे हे विसरून चालणार नाही.
1) इ.स.1360 - हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता.
2) इ.स.1400 - बहामनी सल्तनत कडून जव्हारचे राजे नेमशहा यांच्या ताब्यात देण्यात आला.
3) इ.स.1490 - मलिक अहमद याने किल्ला जिंकला आणि पुन्हा नियुक्ती महादेव कोळी सरादाराची केली.
4) इ.स.1590 - मलिक अंबर आणि मिया मंजू या दोन मोठया सरदारांत या प्रांतावरून वाद पुढे मलिक अंबर विजयी आणि आपल्या जवळच्या महादेव कोळी सरदारची नेमणूक केली.
5) इ.स.1630 - मोघल आक्रमण शहाजी राजे, महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी झाले आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.
6) इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.
7) इ.स.1688 - मोघलांची दक्षिण स्वारी, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.
8) इ.स.1720 - छत्रपती शाहूराजांबरोबर किल्ला मराठा साम्राज्यात आला.
9) इ.स.1750 - पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला. प्रांताचे मुख्यालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिरोजी बांबळे यांची नियुक्ती केली.
10) इ.स.1750-1790 - सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला. राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले.
11) इ.स.1790 - जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले. या काळात देवगाव चे देशमुख/नाईक वाळोजी भांगरे यांनी पेशवाईविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
12) इ.स. 1813 - रामजी भांगरे हे राजूर चे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे झाले.
13) 5 मे 1818 - तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन गॉडर्ड याने किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.
14) इ.स.1820 - रामजी भांगरे, गोविंदराव खाडे आणि त्यांचे पुत्र कृष्णा खाडे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. कॅप्टन मॅन्कीटोश याने बंड मोडून काढले. किल्ल्याचा वाटा बंद केल्या आणि किल्ल्याची नासधूस केली.
15) इ.स.1835 - आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी रतनगड किल्ल्याच्या परिसरात मोठा उठाव केला होता.
16) रतनगड किल्ल्याच्या परिसरात इंग्रजांविरुदध लढताना राघोजी भांगरे यांची बहीण रुख्मिणीबाई खाडे या आदिवासी विरांगणेने आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे.
17) रतनगड किल्ल्याच्या प्रभावाने व तेथील महादेव कोळी नायकांच्या राज्यकारभारामुळे या भागातील व्यापार विकसित झालेला होता.
18) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारकांना या किल्ल्याने आश्रय दिलेला असून येथील आदिवासी बांधवांनी या क्रांतिकारकांना जेवण व हत्यारांची मदत केलेली आहे.
19) रतनगड हे नाव रत्नाबाई या आदिवासी देवतेवरून पडलेले आहे. कळसूबाई, कात्राबाई व रत्नाबाई या तीन बहिणी होत्या. कळसूबाई हे आदिवासी देवतेचे प्रसिद्ध ठिकाण असून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून त्याची ओळख आहे.
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment