![]() |
| डोंगर नाच |
शेणखत देई पिकास
काळ्या आईचा सुगंध
धरी मेघांची हो कास
मेघ कवा बरसेल
उद्या धरित्री सुखावेल
बळीराजा मायेचं लेकरू
नांगराचं गाणं गाईल
जमीन फाटून नागर चालतो
ढेकळ फुटून शिवार फुलतो
पान्हा निसर्गाला फुटून
कणसरी संग संसार डुलतो
संसार डुलतो मनी संस्कृती पुजतो
वृक्षवल्ली देवदेवता रानोमाळी हसते
जीवनाच्या वादळातील इंद्रधनूसंगे
कष्टलेल्या मनामधी डोंगर नाचतो
©www.rajuthokal.com
