जागर हा आदिवासी संस्कृतीचा

आदिवासींचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन

आज आदिवासी समाज आणि या समाजाच्या समस्या, संस्कृती, चालीरीती, राहणीमान, लोकांचा स्वभाव आदी बाबींसंबंधी बाह्यसमाजाला भरपूर माहिती झालेली आहे. यात आज मेडिया, सोशल नेटवर्किंग, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे यात अजून भर पडलेली आहे. गेल्या ६० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा इतर समाजातील लोकांशी खूप संपर्क वाढलेला आहे. संस्कार, संस्कृती, आचा-विचार यांची देवानघेवाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आदिवासींच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडात ज्या समाजसेवकांनी मोलाचे योगदान दिले होते, त्यांच्या सेवेला आजच्या युगात खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज त्यांच्या कार्याचा उपयोग सामाजिक जनजागृतीच्या कार्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. सेवाकार्यासाठी स्वताला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजापुढे आलेल्या सर्वांनी आज गतिमान कार्यास सुरुवात केलेली आहे. सामाजिक संस्था यामध्ये आदिवासी युवा शक्तीचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. सामाजिक संस्था आणि शासनाने दिलेला मदतीचा हात यांमुळे आदिवासी समाज सुधारणेच्या कार्याला गती मिळत आहे.


आज महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत. प्रत्येक आदिवासी जमातीचे सामाजील जीवन, आर्थिक जीवन, सांस्कृतिक वैशिष्ट्ये,चालीरीती, धार्मिकता यांच्यात सारखेपणा आढळत नाही. प्रत्येक जमातीमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात. प्रत्येक जमातीचे सामाजिक जीवन हे सभोवतालच्या भौगोलिक, आर्थिक आणि परंपरागत चालत आलेल्या आणि रूढ झालेल्या जीवनदृष्टीने बनलेले आहे. तसे असले तरी सर्वसामान्य आदिवासींचे जीवन, त्यांची मुल्ये आणि वैशिष्ट्ये यांच्यात सारखेपणा आढळतो.



सर्वसामान्य आदिवासी हा भोळाभाबडा, अबोल, त्रयस्थांबरोबर शक्यतो बोलण्याचे टाळणारा, प्रामाणिक, पापभिरू, दैववादी, परंपरागत जीवनदृष्टीचा, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, त्यात रमणारा, जीवनाचा स्वच्छंदतेणे आनंद लुटणारा असतो. तो जंगल, द-याखो-यात राहणारा असला तरी त्यांची राहणी त्यांच्या निर्मळ अंतकरणाप्रमाणे साधी व स्वच्छ असते. त्यांच्यातील आत्मीयता आणि सचोटी हे गुण वाखाणण्यासारखे आहेत. त्यांची जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र आणि वेगळी दृष्टी आहे. अलीकडे आदिवासींच्या जीवनात पैशाला महत्त्व प्राप्त होत आहे. जमीन, गुरेढोरे, बक-या, कोंबड्या, मासे, खेकडे, आणि शेतात राबण्यासाठी मजबूत हातपाय हीच त्यांची परंपरागत संपत्ती. आपणास हवे ते निसर्गापासून, सभोवतालच्या साधनांतून मिळविण्याची शक्यता असेल तर आदिवासी स्वताला अत्यंत सुखी समजतो.
दळणवळणाच्या साधनांअभावी दूरवरच्या बाजारात चालत जाऊन आपल्या वस्तू विकायच्या आणि मोबदल्यात आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घ्यायच्या हि त्यांच्या जीवनाची आर्थिक घडी आहे. तिच्यात आता हळूहळू बदल होत आहेत. आदिवासींची गावे सामान्यपणे एकाच जमातीची आणि गटागटाने वसलेली असतात. त्यामुळे या भागांत कारागीर वर्ग सापडत नाही. स्थानिक साधनांद्वारे घरे बांधायची व १०-१५ झोपड्यांच्या गटाने राहायचे. या वस्तीला ते पाडा, पोड, झाप किंवा वाडी म्हणतात. ४-५ पादेमिळून आदिवासींचे एक गाव तयार होते. पाद्याचे नाव तेथे राहणा-या प्रमुख कुलाचे, भौगोलिक स्थळाचे, वनस्पतींचे अगर प्राण्याचे असते. उदा.बोरपाडा, वाघ्याचीवाडी, साबळेवाडी, डोंगरपाडा. आदिवासींच्या झोपड्या लहान असतात. घरांना मातीच्या भिंती किंवा बांबूचे अगर कारवीचे कुड असतात. छप्पर गवताचे असते. जनावरे बांधण्याची सोय घरातच एका बाजूला किंवा घराच्या शेजारी केलेली असते. घरात अन्नधान्य साठविण्यासाठी मातीची साठवणे केलेली असतात.त्याला ‘कनगुली, कोथळी’ असे म्हणतात.


आदिवासींचा पेहरावही अगदी साधा असतो. कमरेला लंगोटी किंवा गुडघ्यापर्यंत लावलेला धोतराचा काच्या, अंगात कोपरी किंवा पेहरण असते. आर्थिक परिस्थितीमुळे वारंवार नवीन कपडे घेणे त्यांना शक्य नसते. स्त्रियांचा पेहराव प्रत्येक जमातीत वेगवेगळा आढळतो. कोकणा, महादेव कोळी, ठाकर या जमातींच्या स्त्रिया डोक्यावर फडकी नावाचे वस्त्र घेतात. ते वस्त्र लाल रंगाचे असते. भिल्ल समाजातील स्त्रिया ९ वारी लुगड्याचे दोन तुकडे करतात. एक तुकडा नेसतात आणि दुसरा तुकडा डोक्यावरून घेतात. ठाकर, भिल्ल, कातकरी या जमातीच्या स्त्रियांची पेहराव पद्धती निरनिराळी असते. स्त्रियांच्या दागदागीन्यांतही प्रत्येक जमातीत वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात. महादेव कोळी, कोकणा, ठाकर, आणि भिल्ल या जमाती शेतीवर स्थिर झालेल्या आहेत. काही याला अपवाद असतील. माडिया-गोंड, कोलाम आणि कातकरी यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन अद्यापही अस्थिरच आहे.



0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.