मध्यरात्रीची वेळ आहे....मुलं पार गाढ झोपेत आहेत.....आई आपलं काम आटपून झोपणार...इतक्यात मुलगी उठून आईला म्हणते, ''आई, भूक लागलीय गं.....काही असलं तर दे नां.......''
आईच्या डोळ्यात मुलीच्या या मागणीनंतर पटकन डोळ्यात पाणी आलं...आई प्रयत्न करतेय झोपडीत काही तरी मिळेल अन मी माझ्या लेकीला काही तरी खायला घालू शकेल....पण नाही हे दारिद्र्य......हि गरिबी........हा जीवनाचा काळोख कधीकधी अशी परीक्षा बघतो ना.....मग जीवन नकोसे वाटते.....आई रिकाम्या हाताने.......दुखी अंतकरणाने आपल्या मुलीला पाणी घेऊन येते आणि म्हणते, ''अगं आवडे आत्ता खूप रात झालीय...हे पाणी पी आणि झोप...उद्या सकाळी आपण छान नाष्टा करू......'' किती ऊर भरून आला असलं माउलीचा...याची कल्पना फक्त ती माउलीच करू शकते जिने हे भोगलंय.....आपण काय फक्त सहानुभूतीचे साथीदार.
संसाराचा गाडा ओढत असताना रानावनात हिंडणारी आमची आदिवासी माणसे अशा प्रसंगांना नेहमीच सामोरे जात असतात....पण या समस्या ते कधी उघडपणे इतरांसमोर मांडत नाहीत....आपल्या समस्यांचे भांडवल करून फुकट कुणाच्या मदतीची आस ठेवत नाहीत. पण असे असले म्हणून त्यांच्या विकासाचा गाडा असाच सरकारी योजनांमध्ये रुतून बसावा हे आदिवासी मनाला आज तरी पटणारे नाही. हो कोणी एक हा गाडा नाही ओढू शकत हे मान्य.....परंतु त्या गाड्याला आशादायक मार्ग दाखविण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकतो......आणि तो सर्वांगीण पातळीवर होणे गरजेचे आहे.............राजकीय आखाड्यात कदाचित हा विकास नेहमीच धोबीपछाड होत असेल....पण आपल्या मनात तो आपण उभा केला पाहिजे. त्याला उभारी दिली पाहिजे......विचारांचे खतपाणी घालून आदिवासी मनाचा सूर्य प्रखर तेजोमय झाला पाहिजे....यासाठी आपल्या मदतीची आस आहे.
आपण आदिवासी विकासासाठी आमच्यासोबत काही पावले चालण्यास इच्छुक असाल तर नक्की आम्ही आपल्या पावलावर पाऊल ठेवायला तयार आहोत. तुम्ही काम सांगा....नियोजन सांगा....आम्ही आमचा खारीचा वाटा नक्की उचलू हे मात्र नक्की....पण त्यासाठी आपणास आपले बेगडी मुखवटे बाजूला करण्याची हिम्मत दाखवावी लागेल.
डोंगर द-यात राहणा-या माझ्या माता-भगिनींचं अश्रू पुसण्याचे बळ आज प्रत्येकाला मिळो हि अपेक्षा...!!!
Lets Do It Together
AYUSH ! Adivasi Yuva Shakti
www.adiyuva.in
© www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment