आदिवासी विचारांची ज्योत लावा.....क्रांतीसूर्य
नक्की उगवेल.
गांडील ढवळी इजार नेसली तं पाड्यातला संप्या
कचेरी भराय लागला....आज सांगाय लागला....आपले घरी जि जिन्नस हाये ती आपण खावी कि
दुसरेला द्यावी.....मने आपलेज खावी आणि कुणाल गरजय आसल तर त्यालाही द्यावी.....आणि
आणिक एक त्यातील योक हिस्सा कणसरी देवला दियाल हवा...असा इच्चार मनात आला...
दुस-याल देवा कां आपलेज खावी....असा इचार करता
करता महने झालं...वरीस संपलं....संप्या शिकून असा इचार करताल असं कुणाल बी वाटलं
नव्हत....पर ह्याच्या डोसक्यात काही येगळच खूळ माजलंय ह्ये काय कुणाल कळत
नव्हतं...
संप्या आता दाण्याची ताटका भराय लागला....तो
सावताच ताटका घरी नियाल लागला....यातून तो पुढ दानं येहुचं चुकवाय लागला....यातून
तो पका माजला......त्याची नदार गेली फाटून.....तो आता सवते मंडळीत पेनी खाया
बिलगला....तसाच त्ये देव कणसरीनं ऐकला...ती पळून पळून आता गावाबाहीर निंगून गेली
रात्रीतून.....आता त्येच्या बरोबर पाड्यातील लोकांच्या घरात धान्या खाया मिळत
नाय........पहल्यासारखी परिस्थिती झाली.....तसा तो रडाय लागला....आता रडून काय
उपयोग व्हणार नव्हता....
आदिवासी संस्कृती जो पर्यंत आपण जपणार आहोत तो
पर्यंत निसर्गाच्या साथीने आपले जीवन नक्कीच सुरक्षित आणि अभिमानास्पद असणार
आहे....परंतु आजच्या शिक्षणाच्या चक्रव्युहामध्ये आमची संस्कृती भरडली जात
आहे......तिचे महत्त्व या शिक्षण प्रक्रियेतून जपले जात नाही.....नुसतेच
वेठबिगार.....भाडखाऊ लोकांची निर्मिती केली जात आहे....नसानसांत भ्रष्टाचार पेरला
जात आहे.....व्यसने....नीच प्रवृत्ती यांचे प्रमाण अधिक वाढत आहे......अशा
परिस्थितीत आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.....अन्यथा
एकदा का आपली संस्कृती संपुष्टात आली कि मग भटमान्य समाज व्यवस्थ्येत आपण लाचार
ठरणार हे नक्की.....मग कधी चोर म्हणून तर कधी नक्षलवादी म्हणून दिवसा ढवळ्या मारले
जावू.....मारणारेही आपलेच आणि मारणारेही आपलेच....मग बसा रडत...रडायला सुद्धा उसंत
घेवू देणार नाही हा समाज नावाचा रोग.
चला वेळ आहे....
बळ आहे....
धोरणे आहेत....
माध्यमे आहेत.....
माणसेही आहेत....
धमक आहे.......
गुणवत्ता आहे.....
संस्कार आहेत....
संस्कृती आहे.....
परंपरा आहेत......
वारली चित्रकला आहे.....
आदिवासी जीवन आहे.....
लेखक, कवी असे कलाकार आहेत.....
फोटूवाले, व्हिडीओवाले
आहेत....
अधिकारी आहेत.....
कायदे जाणणारे आहेत....
व्यावसायिक आहेत....
शिक्षक आहेत.....
निसर्ग अजूनही आपलाच आहे....
प्राणी, पक्षी
आपल्यासोबत आहेत.....
फक्त गरज आहे आपण आदिवासी म्हणून जगण्याची आणि
अभिमान जागविण्याची.......
काय करणार ना प्रयत्न......? आपल्या
आदिवासी धर्मासाठी !!!
कुठे जाण्याची....रस्त्यावर येवून नंगानाच
करण्याची आजीबात गरज नाही....घसा ताणून घोषणा देण्याचीही गरज नाही...फक्त एक
करा....आपण ज्या क्षेत्रात आहात...ज्या रस्त्याने प्रवास करता.....जी बस आपणास
आपल्या ठिकाणी पोहोचविते.....जी माणसे आपले जीवन घडवितात....ज्या यात्रेला जायला
मनात उत्सुकता असते......ज्यांच्या लग्नात पायातले बूट/चप्पल काढून प्रसंगी
पत्रावळी उचलाव्या वाटतात.....ज्याच्या खांद्यावर आपण निश्चिंतपणे डोके ठेवू
शकतो.......अशा सर्व ठिकाणी आपण आदिवासी असल्याचा विचार व्यक्त करा....तो
जागवा.....लोकांना तुमची ओळख एक आदिवासी म्हणून होवू द्या....शक्य त्या आदिवासी
बांधवांना मार्गदर्शन करा...मदत करा.....संवाद साधा.....बघा उद्याचा सूर्य
आदिवासींसाठी क्रांती घेवून येईल.....
फक्त आज गरज एक आदिवासीपणाची ज्योत आपल्या मनात
पेटविण्याची.
0 comments :
Post a Comment