आश्रमशाळेची वाजती घंटा…!!!

आश्रमशाळेची वाजती घंटा…!!!

आज प्रत्येक गावागावात शाळा आहेत. शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे. तरीसुद्धा आजही आश्रमशाळांमध्ये प्रवेश मोठ्या प्रमाणात होतात. याचा अर्थ आजही आदिवासी समाजाला पूर्वी इतकीच गरज या आश्रमशाळांची आहे. कारण सकाळी लवकर उठून कामावर जाणारे आई-वडील आपल्या मुलाला खावू घालून शाळेत घेवून नाही जावू शकत. इच्छा असेलही परंतु पोटाचा प्रश्न घरात मुलाला शाळेत जाईपर्यंत नाही बसू देत. आई असो वा वडील दोघेही कधी स्वताच्या शेतात….तर कधी लोकांच्या शेतात राबत असतात. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर ते दोघेही जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे आपल्या मुलाचा अभ्यास घेण्याची मानसिकता नसते. कधी एकदा दोन घास खाईल आणि पाठ जमिनीला लावील म्हणजे झोपेल याचीच घाई त्यांना असते. अशा परिस्थितीत मुलाचा अभ्यास, मुलाच्या अडचणी यांच्याकडे लक्ष्य द्यायला वेळच नसतो. त्यामुळे ही मुले पुरेशा प्रेरणेच्या अभावाने कधी कधी या शिक्षण प्रवाहापासून दूर जाण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून आज आश्रमशाळांची सद्यस्थिती कशीही असली तरी आदिवासी पालकांचा या शाळा आणि या शाळांमधील कर्मचारी यांच्यावर खास विश्वास आहे. आपल्या मुलाला एकदा का आश्रमशाळेत प्रवेश घेवून दिला कि ही माणसे अगदीच निवांत होतात. त्यांना इथेच आशेचा प्रकाश दिसत असतो.
आज आश्रमशाळा व्यवस्थापन, आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता, जेवण, सुविधा, पुस्तके, शिक्षकांचे मुख्यालयी राहणे, आश्रमशाळेतील आजपर्यंतचे विद्यार्थ्यांचे मृत्यू, शाळेची वेळ आदी अनेक विषयांवर गरमागरम चर्चा केल्या जातात. प्रसंगी मोर्चेही काढले जातात. आदैवासी भागात इतर विद्यालयांची मागणी केली जाते. परंतु असे असतानाही आजही आश्रमशाळांचे प्रवेश पूर्ण होतात. आज जरी जिल्हा परिषद वा इतर कोणत्याही विद्यालयांची निर्मिती आदिवासी भागात झालेली असली तरी आदिवासी पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांना अधिक पसंती देतात. हे आपणास आश्रमशाळेत आपल्या मुलाबरोबर गेल्यानंतर कळते. जर आपला मुलगा शहरातील एखाद्या नामवंत शाळेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोठे डोनेशन देवून जात असेल तर त्या शाळांपुढे कदाचित आश्रमशाळा फिक्या वाटतील. भकास वाटतील. परंतु या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पावसाळ्यातील धुक्यात हरवलेल्या वाटेवरून शाळेची वाट शोधत जेव्हा मुले भर पावसात चिमुकली अनेक किलोमीटर अनवाणी चालत येतात आणि शाळेत आल्यानंतर एकच जल्लोष करतात. तेव्हा सह्याद्रीच्या कुशीतील ख-या हि-यांची चुणूक झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आज शासन-व्यवस्था असो वा समाज व्यवस्था यांच्या मध्ये आश्रमशाळा आणि आश्रमशाळेत काम करणे म्हणजे मानेवर लटकती तलवार घेतल्यासारखे अनेकांना वाटू लागले आहे. सह्याद्रीच्या कुशीत निर्मळ अंतकरणाने शाळेवर प्रेम करणारी माणसे आज शाळेपासून दुरावत चालली आहेत. यातून समाजील काही मंडळी आपला कुत्सित हेतू साध्य करण्याच्या इराद्याने आमच्या गुरुजनांना आता अडचणीत आणू लागला आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पूर्वी जे गुणवंत शिक्षक या आश्रमशाळांमध्ये नोकरी करणे म्हणजे सेवा करण्यासारखे आहे असे मानत होते, तेच आज या व्यवस्थेतील आजच्या तथाकथित अडचणींमुळे पुरते हताश झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण पूर्वीसारखी आजची मुले नाहीत. काळाबरोबर मुलांमध्येही बराच बदल झालेला आहे. तो जर विधायक असेल तर त्यात अधिक आनंद आहे. परंतु तो जर विघातक असेल तर सर्वाधिक दुख सहन करावे लागते. आज अनेक गोष्टींमुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागतं आहे. साधे उदाहरण घ्या……

दोन मुलांमध्ये काही कारणास्तव भांडण किंवा बाचाबाची झाली तर त्यात शिक्षकाला मध्यस्ती करावी लागते. भांडण करणे वाईट असते असे सांगून त्यांना सोडून दिले तर त्यांचे पुन्हा भांडण होते. परत शिक्षकाला मध्यस्ती करावी लागते. यात जर शिक्षक थोडा जरी रागावला आणि एखादा मुलगा जर न विचारता तेथून किंवा वसतिगृहातून गायब झाला तर तो सापडेपर्यंत सर्वांच्या नाकीनऊ येते. अनेक दोशारोपांचे विष पचवावे लागते……आणि समजा शिक्षकाने त्या भांडणात मध्यस्ती नाही केली आणि ते मुलांचे भांडण घरच्यांपर्यंत गेले तर शिक्षक म्हणून आपण काय फुकट पगार घेतात काय ? अशा अनेक दुषनांना सामोरे जावे लागते. यात सिताखंडीसारखे एखादे प्रकरण झाले तर मग निलंबन आणि मग सुरु होणारा मनस्ताप……
ना पालक ना आदिवासी विकास विभाग अडचणीच्यावेळी या शिक्षकांच्या पाठीशी उभा राहतो. आज अनेक समस्या वारंवार भेडसावत आहेत. त्यांचा इथे उल्लेख न करणेच योग्य….परंतु या सर्व गोंधळात नवीन चांगले शिक्षक या क्षेत्रात येथून पुढे येणे आता दुरापास्त झालेले आहे. आज आदिवासी समाजातीलच आणि विशेष म्हणजे आश्रमशाळेत आपले शिक्षण पूर्ण केलेली मुले या आश्रमशाळांमध्ये नोकरी/ सेवा करायालां मागत नाहीत. कारण त्यांना माहित आहे…..आश्रमशाळेतील नोकरी जशी आज आहे तशी उद्या असेलच याची शाश्वती नाही. आज आश्रमशाळेत काम करणे म्हणजे एक आव्हान निर्माण झालेले आहे त्यात आशादायक चित्र निर्माण करणे काळाची गरज आहे. नाही तर हे असेच सुरु राहिले तर यातील असुविधा पाहून सरकार या आश्रमशाळा बंद का करू नयेत असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.