गेली जमिन फाटून
मन काट्यावर टांगून
कसं शिवार भिजल
कव्हा आभाळ फाटल?
कोरड घशाला पडली
खपली जखमेची काढली
कसं रान दुखात पेटलं
कव्हा वळिव पडल?
घाई पेरणीची केली
उपाशी वैरण संपली
सर्जा-राजाही आर्त करी
कव्हा बरसणार ह्या सरी?
कशी औदासा ही घुसली
काळी आई ढसढसा रडली
कसं ढेकुळ फूटणार
कव्हा मेघ हा बरसणार?
दुबार पेरणीची वेळ ही आली
जगण्यालाच कशी आग लागली
कसा सह्याद्री नटणार
कव्हा ढगांशी वारा झुंजणार?
राजकीय मुक्ताफळान्ची गर्दी झाली
कृत्रिम पावसाची चर्चाच वाढली
कसा बळीराजा जगणार
कव्हा पाऊस येणार?
©राजू ठोकळ
1 जुलै 2014
(दुबार पेरणी करण्याची जेव्हा वेळ शेतक-यावर येते तेव्हा आपल्या जगण्यालाच आग लागो अशी अवस्था बळिराजाची होते. हे दयनीय चित्र शब्दात मांडने म्हणजे स्वताशी भांडण करण्यासारखे आहे.)
0 comments :
Post a Comment