कनसरी डुल तसी डुलं द्या रं
पानी पड तसा पडू द्या रं
धरतिचे पाठीवर....
बारुन बारा चोवीस वर्षा रं
पानी कसा आला रं
धरतिचे पाठीवर...
बारुन बारा चोवीस वर्षा रं
देव कसा दारी आला रं
धरतीवर पानी पड रं
मांज्या झोपडीत उठ पड रं
पाय गड्या कसा मार धरतीवर रं
धरतीचे पाठीवर पानी पड रं....
धरतरी माझी माय रं...
कनसरी माझी माय रं...
मानुस गेला भुलला रं....
धरतरीवर कनसरी लस लस रं
भारावली कनसरी धरतीवर डुल रं
फार मज्या झाली धरतिचे पाठीवर
कनसरी डुल तसी डुलु द्या रं
पानी पड तसा पडू द्या रं
©संपत ठाणकर सर
मु.जितगाव, पो.दापचारी
ता.डहानु, जि.ठाणे
:::::::::::::::::::::::::::::::¶¶¶www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment