चला माहिती करुया आदिवासी जमातींची…..
धानका-
धानका लोक प्रामुख्याने धुळे व जळगाव या दोन जिल्ह्यांत अधिक प्रमाणात आढळून येतात. धानका जमातीत तडवी, तटारिया व वळवी या उपगटांचा समावेश होतो. या समाजातील लोक भिल्ली बोली बोलतात. धुळे जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या सातपुडा पर्वत रांगांत व लगतच्या गुजरात राज्यात या जमातीचे लोक आपणास आढळून येतात. धानका लोक स्वताला तडवी धानका व तेटारिया धानका या नावांनी ओळखतात. तडवी धानका हे तडवी भिल्लांपेक्षा वेगळे आहेत. तसेच वळवी धानका हे गामित जमातीतील वळवी उपगटाहून भिन्न असल्याचे मानतात. या उपगटांत रोटीबेटी व्यवहार होत नाहीत.
धानका लोकांमधील कुटुंबसंस्था पुरुषप्रधान आहे. वारसा हक्क मुलाला मिळतो, मुलीला मिळत नाही.
या जमातीची घरे चौरस किंवा काटकोन चौकोनाच्या आकाराची असतात. घरे साधी व मातीची असतात. घराला कारवीचे किंवा बांबूचे कुड दोन्ही बाजूंनी शेणामातीने सारवलेले असते. घराला दोन किंवा तीन खोल्या व समोर व्हरांडा असतो. घराला तीन चार दारे असतात. परंतु खिडक्या नसतात. घराभोवती असणारी स्वच्छता पाहण्यासारखी असते.
धानका पुरुष धोतर, बंडी व पागोटे असा पेहराव करतो. लुगडे व चोळी असा स्त्रियांचा वेष असतो. कपाळावर किंवा दंडावर गोंदून घेण्याची हौस आपणास यांच्यामध्ये दिसून येते. चांदीचे व तांब्यापितळेचे दागिने वापरतात.
मुलीचे बाळंतपण नव-याच्या घरी होते. बाळंतपण करणा-या बाईला ‘होण्यानी’ म्हणतात.
लग्न मुलीच्या घरी केले जाते. वयात आल्यावर लग्न जमविली जातात. मामेबहिण, मावसबहिण, चुलत बहिण यांच्याशी विवाह केला जात नाही. एकाच कुळांत लग्न होत नाहीत. अनेक बायका करण्यावर बंधन नाही. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर विवाहसोहळा पार पडतो. शक्यतो पौष, फाल्गुन व पावसाळ्यातील महिने सोडून लग्ने केली जातात. धानका जमातीचा पुजारी लग्न समारंभ करतो. त्यावेळी तो मंत्रहि म्हणत नाही किंवा होमही करत नाही.
धानका जमातीत विधवा विवाह प्रचलित आहे. शक्यतो विधवा विवाह स्त्रीच्या मर्जीनुसार किंवा मयत नव-याच्या धाकट्या भावाबरोबर होतो. परंतु त्याची सक्ती केली जात नाही. कोणताही समारंभ त्यावेळी केला जात नाही. विवाहित स्त्रीला किंवा पुरुषाला घटस्फोट केव्हाही मिळविता येतो.
धानका जमातीतील लोक निसर्गपूजक आहेत. तसेच भूतप्रेत, पिशाच्च, चेटूक यांवर त्यांचा विश्वास आहे. वाघदेव, कालान्कादेव, यांच्यासोबत ते मारुती, गणपती आदी हिंदू देव-देवतान्च्याहि पूजा करतात. काकड वृक्षाला ते पवित्र मानतात. हिंदू लोकांच्या चालीरीतीप्रमाणे ते पाडवा, नागपंचमी, होळी, दसरा आणि दिवाळी हे सण साजरे करतात. सूर्यदेव, चंद्रदेव यांनाही ते पवित्र मानतात.
धानका लोक व्यवसायाने शेतकरी व शेतमजूर आहेत. त्यांच्या राहत्या घराशेजारी ते प्रामुख्याने ज्वारी-बाजरी, मका, तूर हि धान्य व काही भाजीपाला पिके पिकवतात. ते मटण, मासे खातात. शिकारही करतात. शेती हे त्यांचे उपजीविकेचे साधन आहे.
धानका लोकांत मयत इसमास जाळण्यात येते. तीस-या दिवशी प्रेत जिथे जाळले असेल तिथे शिजलेले अन्न ठेवले जाते. १२ व्या दिवशी जाती बांधवांना जेवण दिले जाते. पाच दिवस सुतक पाळणारे जातीला १० व्या दिवशी जेवण देतात.
धानका जमातीत पारंपरिक पंचायत आहे. मुख्य पंचास ‘ज्ञाती पटेल’, ‘पंच’ किंवा ‘कारभारी’ असे म्हणतात.
दिवाळी व होळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यावेळी नाचगाणी व दारूचा मनमुराद आनंद लुटला जातो. गावठी किंवा मोहाची दारू पिणे हि त्यांची नेहमीची सवय आहे.
धानका लोकांनी आपल्या बोलीभाषेशिवाय प्रादेशिक भाषा म्हणून मराठीचा अंगीकार केलेला आहे.
Ref. Dr.Govind Gare's Articles

0 comments :
Post a Comment