ख-या इतिहासाच्या शोधात....
शुर धनुर्धारी अर्जुन शिकविला
परन्तु कोणताही गुरु नसताना
अर्जुनालाही लाजवेल अशी धनुर्विद्या असणारा
एकलव्य नाही शिकविला.....
गांधीजी, नेहरू यांचेसारखे राजकारणी शिकविले
परन्तु देशासाठी , आदिवासी धर्मासाठी तुरुंगात
अखेरचा श्वास घेणारा बिरसा मुंडा नाही शिकविला...
उद्या कदाचित अफजल गुरु आणि कसाबही शिकवतील
परन्तु रामजी भांगरा, तंट्या भिल्ल,
ख्वाज्या नाईक, राघोजी भांगरा नाही शिकवणार...
पाकिस्तानची निर्मिती शिकवली
परन्तु जव्हारचे जायबाराज मुकणे यांचे संस्थान
आदिवासिंच्या गौरवशाली इतिहासाची
साक्ष आहे हे नाही शिकविले...
चीनची भिंत शिकवली...
परन्तु लोहगडाचे दरवाजे उभारत असताना
एका आदिवासी दाम्पत्याचा बळी दिला हे नाही शिकविले....
गोवर्धन पर्वत उचलणारा श्रीकृष्ण शिकविला
परंतु तो उचलत असताना त्याला हातभार लावणारे
संवंगडी आदिवासी होते हे नाही शिकविले....
लंका जाळणारा हनुमान शिकविला....
परंतु त्याला मदत करणारी माकडे नव्हती
तर आदिवासी माणसे होती हे नाही शिकविले...
घुसखोर आतंकवाद्यांच्या मृत्यूचा हजारवेळा पाढा शिकवला
परन्तु शिवनेरी किल्ला जिंकला
म्हणून हजारो महादेव कोळ्यांची झालेली हत्या
आणि त्याची साक्ष देणारा कोळी चौथरा नाही शिकवला.....
कल्पना चावला, सुनीता विल्यम्स
फक्त भारतीय वंशाच्या तरी अभ्यासक्रमात
परंतु राणी दुर्गावती सापडत नाही इतिहासात...
आता किती दिवस इतरांच्या इतिहासाचे पाढे वाचणार
ज़रा आपलाही भुतकाळ बघुया.....
सह्याद्रिची अनेक रत्ने आपल्याला त्यात दिसतील....
-राजू ठोकळ
©www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment