कलाडगड, ता.अकोले, जि.अहमदनगर

कलाडगड, अकोले तालुका

Image

अकोले तालुक्याला अनेक निसर्ग संपन्न गडदुर्गांचा वारसा लाभलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कळसुबाईच्या सर्वोच्च शिखराबरोबरच रतनगड, हरिश्चंद्र गड, विश्रामगड, भैरवगड, कुंजरगड आदी महत्त्वपूर्ण गड आहेत. यांच्या सोबतीलाच मुळा खो-यावर आपली करडी नजर असलेला कलाडगड अगदी एकांतात असला तरी त्याच्या सभोवताली असणारी निसर्ग सौंदर्याची खाण आणि आदिवासी संस्कृती, जनजीवन आपल्या दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आपण एकदा तरी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे.

पथदर्शक महिला

या गडाची सरासरी उंची ११०० मी. आहे. पाचनई या हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याजवळील गावातून दिसणारा परंतु पटकन लक्षात न येणारा असाच हा दुर्ग आज मला खुणावत होता. पाचनईला लिंबू सरबत घेवून थोडीशी विचारपूस करून आम्ही पेठेच्यावाडीकडे जाणा-या रस्त्याने आगेकूच केली. गडाच्या अगदी पायथ्याजवळून आम्ही जात असताना नेमकी गडाकडे जाणारी वाट आम्हाला सापडली नाही. शेवटी काही अंतर पुढे जावून आम्हाला परत फिरावे लागले. तिथे एक घोगरे नावाची मावशी भात कापणीचे काम करत होती. तिला रस्ता विचारला असता, ती २०० मीटर चालत…..आपले काम सोडून आम्हाला गडाकडे जाणारी वाट दाखविण्यासाठी आली. आपल्या ठाकर समाजाच्या बोलीभाषेत तिने उत्कृष्टपणे रस्ता दाखविला. त्या मावशीच्या त्या मार्गदर्शनाचा खरच खूप हेवा वाटला….आपल्या हातातले काम सोडून इतके अंतर चालत ती आम्हाला रस्ता दाखविते….एका शहरी संस्कृतीला लाजवेल अशीच हि माणुसकी मला त्या मावशीकडून शिकायला मिळाली.

गडावरून दिसणारे आदिवासी गाव, पेठ्याचीवाडी

पाचनईहे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास  दीडतासामध्ये चालत कलाडगडाच्या पायथ्याला आपणास पोहचता येते परंतु स्वताची गाडी असेल तर अती उत्तम आणि लवकरच रस्ताही अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. कारण सध्या येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

DSC_0040 DSC_0044 DSC_0045 दुर्ग अवशेष

कलाडगडाचाडोंगर एकांतात वसलेला डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्‍यामंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्वअंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसेकुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत असेल असे सध्या त्या कुंडातील पाण्याची सध्यस्थिती पाहून वाटते.. गडावर जाणारी वाटबर्‍यापैकी मळलेली आहे. परंतु वनविभागाने गडावर जाणा-या वाटेच्या बाजूचे गवत कापलेले असल्याने वाट शोधण्यास अडचण येत नाही. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिकगावकर्‍यांची गडावर अधून मधून हजेरी असावी कारण गडावर विविध ठिकाणी नजीकच्या काळात देव-देवतांना शेंदूर लावलेला दिसला.. घसार्‍याची वाट असल्याने काहीशीकाळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत.काही पायर्‍या चढून आपण गडावर प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५०मिनिटे लागतात. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे.पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. बाहेर नागोबा दैवत आहे. त्यासमोर साकीरवाडीच्या गावक-यांनी बसवलेली एक तांब्याची मोठी घंटा आहे. तिचा घंटानाद केला कि त्या आवाजात आतापर्यंतचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि आपण आजूबाजूच्या परिसरातले निसर्ग सौदर्य अनुभवत बसतो. भैरोबाला वंदनकरुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिमअंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्यपाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे.गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुनहरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्याघाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असाविस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही  मनाला मोहवून टाकते. गडावरून दिसणारे पेठ्याच्यावाडीचे दर्शनही खूपच मनोवेधक दिसते. अशा प्रकारे कलाडगडाची आजची भटकंती करत असताना विशाल नाईकवाडी, विठ्ठल गोरे, बापू पवार राहुल गहरवाल यांची सोबत मनाला दुर्गभ्रमंतीची उर्जा देणारी ठरली.


©www.rajuthokal.com

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.