‘अजुन किती काळ?’
कवी संजय दोबाडे यांचा ‘अजुन किती काळ?’ हां काव्य संग्रह वाचनात आला. जीवनाच्या जाणिवा अधिक समंजस आणि प्रगल्भ बनवणारं समृद्ध आणि श्रीमंत अनुभवविश्व माझ्यासमोर उभे राहिले. एकुणच जीवनाकडे बघणारी दृष्टी अधिक नितळ आणि स्वच्छ करणारी कविता वाचायला मिळाली.माणसातुन माणसाचे हरवलेले माणूसपण हां संजय दोबाडे यांच्या कवितेचा विषय आहे.
‘भूक’ कवितेतील
पोटात भूक मावेनाशी झाल्यावर मी
उभा राहतो हात वेंगाडत
अधाशी कुत्र्यासारखा लाळ घोटत
एखादा तुकडा भाकरीच्या आशेने
या ओळि मला अंतर्भूत करून गेल्या. काबाडकष्ट करूनही आदिवासी माय-बापावर अशी वेळ येते याचे अति दुःख मनाला भेदुन गेले.
धुकं कवितेतील
‘मलाही आत घ्या
मिळू दया थोड़ीशी उब’
या ओळी मनात मदतीचे हात पुढे करायला भाग पाडतात. दुःख कसे जड़ होते याची जाणीव यात होते.
तसेच ग गरीबिचा म मरणाचा
भ भाकरीचा न नकाराचा अशी जीवनाची बाराखडीह़ी उत्तम रेखाटली आहे.
इतिहास कवितेतून आदिवासी क्रांतिकारी इतिहासावर तथाकथित इतिहासकारान्नी केलेला अन्याय समजला. त्यातून आपला इतिहास आपणच लिहिण्याची गरज स्पष्ट होते.
सभोवताली घदना-या अनेक घटना कविला अस्वस्थ करतात. त्यातून साकारलेल्या कविता आपण नक्कीच वाचाव्यात.
अजुन किती काळ? या काव्य संग्रहाची किंमत फक्त 100 रुपये आहे. यातील कविता नक्कीच आपली साहित्यिक तहान तृप्त करतील अशा आहेत.
आपणास पुस्तक हवे असल्यास श्री संजय दोबाड़े सर यांच्याशी 9767649544 या क्रमांकावर संपर्क साधावा. आपणास पुस्तक पोस्टाने घरपोच केले जाईल.
शेवटची डरकाळि फोडू या
चला गड्यांनो आता
जुलुमाला मातीत गाडू या !!!
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment