शेतकरी राजा
....................................
तुझं काय ब्वा
गुलाबावाणी सजनं...
माझं कसय भौ
काट्यागत जगनं....
जमिन माझी भाऊ
अजुनही भेगाळ लाल माती
तुला काय साहिबा
तुझी सा-या जगात ख्याती
चिखलात गाडावं दुःख
परी तो बरसत नाही
आहे दुष्काळ जरी
तुझा पगार कमी नाही
डोळ्यातल्या पाण्याशिवाय
तर मला करमत नाही
तुझ्या अपार संपत्तीला
तर माझा गाव दिसत नाही
कालच्या मातीतले
सोने आज हरवले ते कसे ?
तुझ्या प्रगतीसाठी
हिरवे रान झिरपले ते कुठे ?
मातितला घाम
तूला एकच पुसे
मनाच्या कोप-यात
बघ तुझ्या जन्माचे ठसे
माझ्या जगण्यातला तुला
कधी लागेल रे ठाव ?
माझ्या मालासाठी तू
देशील का रे भाव ?
शेतकरी राजा म्हणती
परी रूप आज निराळे
तूच माझा बंधू
तरी जग तुझे निराळे
©राजू ठोकळ
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment