मला गडकिल्ल्यांवर डोंगरद-यात मनसोक्त भटकायला आवडते... गडकिल्ले डोंगरदरे म्हटले की समोर उभा राहतो हा अफाट रांगडा कणखर सह्याद्री...आणि सह्याद्री म्हटले की समोर उभे राहतात महाराष्ट्राला गुलामीच्या शृंखलेतून मुक्त करणारे शहाजीराजे, आई जिजाऊ, छञपती शिवराय, छञपती शंभूराजे आणि यासोबतच स्वराज्यासाठी प्राणार्पणाने लढणारे शूरवीर मावळे... या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीत आपला जन्म झाला याचा सार्थ अभिमान तर आहेच... आपण या मातीचे देणे लागतो याच उदात्त भावनेने गडवाटची मेट रोवली गेली... आपल्या सवंगड्यांना घेवून गडकिल्ल्यांवर फिरता फिरता आम्ही आपला वैभवशाली इतिहास पुन: प्रज्वलित करण्यासाठी, शिवरायांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठीच हे शिवधनुष्य हाती घेतलयं... याचबरोबर विविध उपक्रम ठेवून सामाजिक बांधीलकी जपन्याचा आम्ही ध्यास घेतला आहे...
गेली 3 वर्षे हे कार्य अखंडपणे सुरुच आहे... आज गडवाट ग्रुपचा "गडवाट परिवार" होताना जो आनंद होतोय तो शब्दात सांगणे, व्यक्त करणेच कठीण... छञपती शिवरायांच्या प्रेरणेने स्थापित "गडवाट" या चार अक्षरी नावाची ओळख तुम्ही सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून घराघरात पोहोचवलीत... या कार्यात परिवारात सहभागी झालेल्या मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्व सवंगड्यांचे सहकार्य प्रचंड महत्वाचे ठरले... कोणताही स्वार्थ न बाळगता तुम्ही सदैव सोबत राहिलात आणि यापुढे ही सोबत कायमचीच राहील यात शंका नाही... परिवारातील तुम्हा सर्वांची नावे सांगता येणार नाहीत... कारण जिथे 'मी'संपतो तिथे 'आम्ही' सुरु होतो... आम्ही म्हणजे "गडवाट" हीच आमची ओळख...
तुम्हा सर्वांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद हेच आमचे समाधान.. शिवरायांच्या प्रेरणेतून काहीतरी नावीण्यपूर्ण करण्याचे कार्य अखंडीतपणे सुरुच राहील...
आपल्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे :-
१) सह्याद्री प्रतिष्टानसोबत दुर्गसंवर्धन आंदोलनात सहभाग.
२) कलावंतीण दुर्गभ्रमंती ...
३) लोहगडावर साफसफाई करून शिवजयंती साजरी
४) वासोटा दुर्गभ्रमंती
५) श्रीक्षेत्र तुळापुरला संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट.
६) श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधिस्थळी होणाऱ्या सुशोभीकरण बांधकामास आर्थिक सहाय्य आणि वृक्षारोपण
७) २ जून रोजी रायगडावरील होळीच्या माळावर असलेल्या मूर्तीच्या छत्रारोहन कार्यक्रमात सहभाग
८) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुळापुर गावास पाण्याची टाकी भेट.
९) किल्ले कर्नाळा दुर्गभ्रमंती
१०) किल्ले प्रबळगड दुर्गभ्रमंती
११) १५ ऑगस्ट रोजी पनवेल येथील वृद्धाश्रमास भेट
१२) जुहू शिवस्मारक स्वच्छता मोहिमेला सुरुवात
१३) किल्ले माहुली दुर्गभ्रमंती
१४) तुळापुर येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे रंगकाम व पाण्याची टाकी भेट
१५) शिवदीपोत्सव साजरा
१६) तोरणा ते राजगड पदभ्रमण
१७) संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान
१८) सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथालयात शिवजयंती साजरी
१९) चंदेरी दुर्गभ्रमंती
२०) संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिकसळ या गावी दुष्काळग्रस्तांच्या छावणीस पाणी आणि चारावाटप केले
२१) जंजिरे कुलाबा, सर्जेकोट, हिराकोट आणि कोर्लई दुर्गभ्रमंती
२२) किल्ले अर्नाळा दुर्गभ्रमंती
२३) १४ मे संभाजी महाराज जयंती साजरी
२४) रायगड येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा
२५) पंढरीच्या वारकर्यांसाठी फलटण येथे पाण्याची सोय
२६) खडकवासला पुणे येथे वृक्षारोपण
२७) त्रिंगलवाडी दुर्गभ्रमंती
२८) मावळा जवान संघटनेसोबत राजगड येथील पाली दरवाजा ठिकाणी ढासळलेल्या पायऱ्याजवळ श्रमदान.
२९) विकटगड (पेब) भ्रमंती
३०) "पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड पदभ्रमण मोहीम" !!
३१) "शिवस्मारक व परिसर स्वच्छता - सातारा, पोवई नाका"
३२) Gadwat Waterfall Rappelling at Diksal (Bhivpuri) 25th Aug २०१३
३३) महाराणी सरकार सईबाईसाहेब पुण्यतिथी पालीखुर्द (राजगड)
३४) कळसुबाई ट्रेक
३५) "दसरा सोहळा - शिवरायांच्या गडकिल्ल्यावर"
३६) "शिव-दिपोत्सव" २०१३ (१ नोव्हेंबर २०१३) संपूर्ण हिंदुस्तान
३७) गडवाट सह्याद्री स्वच्छता मोहीम (२४ नोव्हेंबर २०१३)
३८) गडभ्रमंती : किल्ले हरिहर, किल्ले अंजनेरी, किल्ले रामशेज (२८ व २९ डिसेंबर २०१३ )
३९) राजमाता जिजाऊ जयंती !! (१२ जानेवारी २०१४)
४०) राज्याभिषेक रणधुरंधर छत्रपति शंभूराजेंचा !!
४१) उपेक्षित मुलांच्या सांगाती, गडवाटची यंदाची शिवजयंती !! (१९ फेब्रुवारी २०१४)
४२) छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ( ११ मार्च २०१४ )
४३) हरिश्चंद्रगड भ्रमंती
४४) किल्ले वसई - सागरी किल्ले भ्रमंती (३० मार्च २०१४)
४५) ३ एप्रिल २०१४ - छत्रपति शिवाजी महाराज पुण्यतिथी
४६) सफर खांदेरी-उंदेरी जलदुर्गांची
४७) रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
४८) सफर "टकमक" किल्ल्याची
४९) शिवरायांची "आग्र्याहून सुटका" गडवाट आयोजित, दुर्गमहर्षी श्री प्रमोद मांडे यांचे सचित्र व्याख्यान
५०) शिवराज्याभिषेक सोहळा (६ जून २०१४) दुर्गदुर्गेश्वर - रायगड
५१) गडवाट निसर्ग संवर्धन मोहिम (वृक्षारोपण)
52) शिवनेरी येथे ग्रंथ दिंडी व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला..
गडवाट वर्धापन दिनानिमित्त सर्व सवंगड्यांना हार्दीक शुभेच्छा...!!!
जय सह्याद्री
जय शिवराय
0 comments :
Post a Comment