आंबिल

आदिवासी म्हटले की आपणास त्याच्या जगण्याच्या जादुई कलेचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही...
यास कारणही असेच आहे....
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर
आपले वास्तव्य अबाधित ठेवत असताना त्यास अनेक
समस्यांना तोंड द्यावे लागते....
जगण्याच्या अनेक समस्यांशी संघर्ष करत आदिवासी जंगलाचे संवर्धन करत असतात....या जंगलातच
त्यांच्या जगण्याची कंदमुळे दडलेली असतात....
परंतु दुर्दैव व्यावसायिक दृष्टीकोनातुन आज निसर्ग
संपदा ज्या वेगाने लुटली जात आहे, त्याचा अतिशय विपरीत असा परिणाम आदिवासी जगण्यावर होत आहे...
आदिवासी लोक आपल्या मुलांसाठी, कुटुम्बासाठी नाचणिच्या किंवा वरईच्या पिठाचे अंबिल करतात...यावरच सम्पूर्ण कुटूम्बाचे पोषण होते. कधी कधी अम्बिल बनविण्यासाठी पीठ घरात मिळत
नाही....
पोटाची आग शमविण्यासाठी मग निसर्ग आपला हातभार लावतो...
अम्बिल न मिळाल्यास जंगलातील झाडपाला, कंद-मुळे
खावुन आपले जगणे बहरत ठेवण्याचे काम आदिवासी करतात....
परंतु दुर्दैवाने आज आदिवासींच्या या निसर्ग स्त्रोतांवर
विकास नावाचा रोग कुठेतरी काळाचा घाला घालत
आहे...
व्यावसायिक आपल्या हव्यासापोटी सह्याद्री वैभवाचे
शिरोमणी वृक्षांची कत्तल करत आहेत....
माळशेज घाटातुन आपले लक्ष्य वेधून घेणारी हिरवाई जवळून जावून बघितल्यास लाकडाचे ओंडके आपल्या मनावर तिष्ण वार करून जातात.....
पण यास आवरणार कसे....? या परिसरातील
आदिवासिंच्या जगण्याचे स्त्रोत जपणार कोण?
असे अनुत्तरित करणारे प्रश्न मला सह्याद्रिची माफी मागायला भाग पाडतात....कारण इथे मी काहीसा असहाय होतो...
save sahyadri souls......save tribals

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.