मलाही वाटते...
मलाही वाटते...
उद्याचा आदिवासी
सुटाबुटात दिसावा
संस्काराने मात्र
निटनेटका असावा
मलाही वाटते...
बा माझा
इस्तरिच्या कापडात
जगभर फिरावा
तारपाच्या नाचात मात्र
तो देहभान विसरून नाचावा
मला ही वाटते...
माय माझी
साडी नेसून
कामावर जावी
आवणीच्या वख्ताला
धांदुक फड़कीची
गोडी मनात असावी
मलाही वाटते....
भाऊ माझा
कालिजात शिकावा
समाजात आल्यावर
आदिवासी म्हणून शोभावा
मलाही वाटते....
बहिण माझी
मोठ्या पगाराच्या
नोकरीला लागावी
आदिवासी संस्कृतीची
बोली ओठी असावी
मलाही वाटते...
पाडा माझा
आधुनिकतेने सजावा
घोंगडीच्या उबेतला
आजोबा मात्र
देवघरात पुजावा
मला ही वाटते...
आदिवासी जगाच्या
प्रवाहात यावा
निसर्ग धर्माचा
महामेरु तो व्हावा
©www.rajuthokal.com
(FEEL FREE TO SHARE THE POEM)
0 comments :
Post a Comment