आदिवासी संस्कृती- माधव सरकुंडे

Madhav Sarkunde यांचा लेख

You have to change as well , if you want to survive  ह्या दीड ओळीच्या पोस्टमध्ये फार
महत्वाची गोष्ट सामावली आहे. म्हणूनच मला ह्यावर माझे मत मांडावे वाटले. यात सांगितलेली गोष्ट सर्व
आदिवासीना समजेल तेव्हा त्यांच्या मानसिकतेत फार
मोठा बदल होईल. जगाच्या लोकशाहीचा आधार
आदिवासींमधील गणराज्य पद्धती हेच आहे. प्रत्यक्ष
शिद्धार्थ बुद्ध म्हणतो संघाची कल्पनाच मी आदिवासीकडून घेतली. तसेच अरस्तु( Aristotle) सुद्धा म्हणतो कि मी लोकशाहीची विचार आदिवासीकडून घेतला.
(कांचा इलियचा ग्रंथ वाचा: God as a Political Philosopher)

मघदचा राजा अजातशत्रू ह्याने जेव्हा वज्जी येथील
आदिवासी राज्यावर हल्ला करण्याचे ठरविले होते तेव्हा, त्याचा मंत्री वस्साकार त्याने भगवान बुद्धाकडे
पाठविला होता. हेतू एवढाच कि त्याला वज्जी आदिवासीवर आक्रमण करायचे आहे, ते बुद्धाच्या कानावर टाकायचे होते. भगवान बुद्ध तेव्हा गिध्द
शिकारावर विश्रांती घेत होते. बुद्धाने आनंदाच्या द्वारे जे
काही वस्साकाराला सांगितले त्यातून स्वतः भगवान बुद्ध आदिवसी गण व्यवस्थेचा किती सन्मान करत होते हे लक्षात.
( देबिप्रसाद चटोपाध्याय ह्यांचा ग्रंथ :लोकायत
वाचा .पृष्ठ क्र १७३-१७४ )

आदिवासींनी या जगाला काय काय दिले नाही. परंतु
विषमतेवर श्रद्धा असणा-या समाज व्यवस्थेनी आदिवासी म्हणजे नालायक आणि रानटी असा समज जनमानसात पसरविला. आदिवासी हा शब्दच शिवी समान करून टाकला. Shame ! Shame ! Shame!

दोस्तो हो !आदिवासीवरील आक्रमण नवीन नाहीत.
अगदी वैदिक काळापासून धनगरांच्या घुसखोरीपर्यंत
आदिवसीवरील अतिक्रमणाची दीर्घ परंपरा आहे.
पूर्वीचा काळ कसा होता ते सोडा.आज मात्र शिकलेल्य
लोकांनी पुढे आले पाहिजे.आणि विषमतावाद्द्यानी मलीन केलेली आदिवासींची प्रतिमा उज्ज्वल केली पाहिजे. आदिवासी म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया.आदिवासी म्हणजे नैतिक मुल्यांचा स्त्रोत आदिवासीनीच मानवतावाद जगात रुजविला आहे. पृथावरील सर्व जीव जीत्रबना जगवणार पर्यावरण आदिवासींनीच जतन करून ठेवलं.आणि आज ह्या आदिवासीला जगातून नामशेष करण्यासाठी सारेच पुढे सरसावले आहेत. परंतु त्या सर्व दुष्ट शक्तीना मी सांगू इच्छितो कि तुम्ही आदिवासींना संपवूच शकत नाही.

Becuase the ship you want to drown is carrying you too. Hey ,hegemonists ! You can't go ahead, leaving us back . Your destiny is linked with us and the reverse, Times have changed a lot now.and you have to change as well , if you want to survive.

Jay Birsa


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.