आदिवासी मित्रानो !
तुम्हाला आणि तुमच्या समाजाला , तुमचा अभ्यासच वाचवू शकतो. धनगराच्या विरोधात या वेळी आपण रस्त्यावर उतरलो हे ठीक आहे. जेव्हा जेव्हा अशी संकटे येतील तेव्हा तेव्हा आपणास रस्त्यावर उतरावेच लागेल. परंतु रस्त्यावरची लढाई नेहमीच यशस्वी होतेच असे नाही. या विश्वात विविध समाजात आपल्या समाजाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एक छुपे शीत युद्ध सुरु आहे. या युद्धातले सर्व आयुधं बौद्धिक आहेत. ज्या समाजाकडे जितके जास्त बौद्धिक सामर्थ्य तितका तो समजा बलवान असणार आहे.
आपल्या शेजारचा दलित समाज कसा विकसित झाला ह्याचा काधी आपण साकल्यान्ये विचार केला का ?.बाबासाहेबाचा माणूस किती वाचन करतो. वाचनातून त्यांच्या बुद्धीचा प्रचंड विकास झाला. ग्रंथातून प्राप्त केलेले ज्ञान समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोहचवितात. त्यासाठी ते कित्येक वर्षापासून साहित्य
चळवळ राबवितात. अलीकडच्या काळात ते धम्म परिषदांचे आयोजन करू लागले. यवतमाळ येथून सुरु
झालेल्या समता पर्वाच्या चळवळीने आता सर्व महाराष्ट्र
व्यापला. जगभरातले विद्वान वक्ते त्यांच्या मंचावर येतात. समाजाच्या अनेक प्रश्नावर सखोल चिंतन होते.आपल्याकडे अशी चळवळ आहे का? चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी ......ती चालविण्यासाठी वैचारिक रसायन हवे असते....... ते आहे का आपणाकडे ? आपल्या चळवळीतले ९०% कार्यकर्त्ये राजकारणात शेटल होण्याच्या हेतुनेच चळवळीशी नात ठेवतात. चळवळीचे सोंग करतात. मला वाटते आपण असे करू नये. ह्यामुळे समाजाची दिशाभूल होते.
माझी मनापासून कामना आहे. काही लोकांनी राजकीय
हेतू मनात न ठेवत निखळ भावनेनी समाजासाठी काम करावे. समाजाच्या प्रश्नावर चिंतन करावे. त्यासाठी वैचारिक चळवळ उभी करावी.समाजात वाचन संस्कृती रुजवावी. दलित समाजात जशी विद्वानाची विचारवंताची फळी तयार झाली तशी आदिवासीमध्ये तयार झाली पाहिजे.म्हणून माझी आदिवासी युवकांना विनंती आहे कि खरेच त्यांना समाजासाठी काम करायचे असेल तर त्यांनी रेतीवर ताजमहाल बांधण्याचे सोडून द्यावे. समाज कार्याची एखादीच शिल्परेषा पाषाणावर कोरावी. ती येणा-या पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकेल. रेतीचे कितीही उंच मनोरे उभे केल तर ते वा-याच्या एका झुळकीसरशी भुई सपाट होतील. करा थोडा विचार. धन्यवाद !
जय आदिवासी
-प्रा.माधव सरकुंडे
0 comments :
Post a Comment