... आम्ही आदिवासी ...
आम्ही आदिवासी
ह्या डोंगरचे रहिवासी
ह्या सह्याद्री माथ्यावर
पिढ्यान पिढ्याची आमची वस्ती
ह्या डोंगर रानामंदी
टाकती शिकारिसाठी फासी
आम्ही आदिवासी आदिवासी
पड़े सुकाळ वा दुष्काळ
कंदमुळे मिळे आम्हासी
आम्ही आदिवासी आदिवासी
ह्या निथळ पान्यामंदी
खेकड़ खेळती गरवनीशी
आम्ही आदिवासी आदिवासी
नदी नाला डोंगर माळरान
नातं जूनं आमचं त्यांच्याशी
आम्ही आदिवासी आदिवासी
(रानपाखरं)
0 comments :
Post a Comment