फराळ वाटप कार्यक्रमाची पोस्ट टाकली आणि अनेकांचे फोन येवू लागले की आम्ही येणार आहोत. यामुळे आम्हालाही हुरूप येत होता. राजाराम बेंडकोळी यांनी पोस्ट वाचुन फोन केला आणि त्यांच्या गावात पूर्ण सहकार्य केले जाईल असा शब्द दिल्याने आम्ही निश्छिंत होतो. त्यात योगेश नागरे हे सुध्दा अगोदर जावून चर्चा करून आले होते. बाळु फोडसे, नितिन बेणके यांच्या पुढाकाराने आम्हाला बळ मिळाले होते.
एक औचित्य म्हणून काही मान्यवर व्यक्तिंना फोन करून येण्याची विनंती केली होती. नेहमीच फोटोला लाईक करणारे हो आम्ही येणारच असे म्हणत होते.
ईश्वर सहाणे तर काय सदा पुढे असतात. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायला आम्ही कधी मागे पुढे पाहत नाही. दत्तु दादा भवारी आणि नागपुरे काका हे तर आमचे captain यांनी फराळाचे पूर्ण नियोजन केले होते. यात संदीप थिगळे, अभिजित बुळे, मुकुंद साबळे, दीपक भांगरे यांनीही पुढाकार घेतला.
एकंदरीत कंपू छान जुळला होता. प्रतीक्षा होती ती प्रत्यक्ष कार्यक्रमाची.....आणि तो दिवस उजाडला. तसा वातावरणात गारवा असला तरी आमची ऊर्जा बरीच उत्साही होती. 30-35 जणांच्या उत्साहाला बिताका येथे पारावार राहिला नव्हता. प्रत्येक जण आपल्या परीने नियोजन आणि कार्यक्रम पार पाडत होता.
जयराम शिंदे, भरत मेंगाळ, कांबळे सर आदींच्या उपस्थित रंगत वाढली होती. बालकांच्या चेह-यारील भाव आम्हाला प्रेरणा देत होते. सर्वांचे फराळ एकत्र करून सर्वांच्या घरी पोहचविण्यात आले. सहाने बन्धुन्चा पुढाकार याकामी मोलाचा होता.
प्रा.सुरेश देशमुख यांनी आदिवासी बांधवांना उद्देशून बोलताना आपल्या जमीनी न विकण्याचि विनंती केली. कारण आज अकोले तालुक्यात आदिवासी बांधवांच्या जमीनी विकत घेवुन त्या धनदांडग्या लोकांच्या घशात घालण्याचा धंदा जोरात सुरु आहे. यात शहरात कमावलेला काळा पैसा खरा करण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना भोळा भाबडा आदिवासी मात्र देशोधडीला जात आहे. जमिनीला मिळालेली किंमत व्यसनात संपल्यावर भिक मागण्याचि वेळ अनेकान्वर आलेली आहे याची जाण त्यांनी बोलून दाखविली.
योगेश्वर नाईकवाडी, घनश्याम दराडे, जितेंद्र गोंदके, दत्ता तळपाडे आणि स्थानिक गावकरी व आमचे सर्व सहभागी बांधव यांच्या एकत्रित प्रयत्नाने फराळ वाटप आनंदमयी वातावरणात पार पडला.
यानंतर बितनगडाकड़े कुच करण्यात आली. आपल्या वाक्चातुर्याने वातावरण हसत खेळत करण्याचा प्रयत्न सर्वजन करत होते. गडाच्या पायथ्याला पोहचल्यावर आमचे स्नेही नारायण काका चौधरी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
दुपारची वेळ झाल्याने जेवण करून गडावर जाण्याचा बेत ठरला. सर्वांनी आपल्या खमंगदार पदार्थान्नी वातावरण स्तब्ध करून टाकले. पहिल्यान्दाच अनेक वर्षांनी नागलिच्या भाकरी खाण्याचा अनुभव खुप ऊर्जा देणारा ठरला.
भटकंती दरम्यान प्रत्येक जन आपल्या परीने सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत होता. हा आनंद सह्याद्रीच्या उदरातच आपणास लाभतो म्हणून आपण यासाठी वेळ दिला पाहिजे.
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती...सह्यभ्रमंती
26.10.2014
0 comments :
Post a Comment