काळ
माझे शब्दच मला
आता तोचु लागले आहेत
माझी दुखेच मला
आता बोचू लागले आहेत
माझ्यातला मी पणा
अजूनही गळून पडत नाही
माझ्यातला स्वार्थी बाणा
अजूनही जळून खाक होत नाही
मोडला कणा कधीच
संसारात श्वास झुरत आहे
साधला निशाना त्यांनीच
संस्कारात विश्वास शोधत आहे
आले कित्येक परकी प्रवाह
माझी नाळ माझ्यापासून तुटत नाही
झाले कित्येक बेरकी हल्ले
माझा काळ माझ्यापासून सुटत नाही
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment