मह्या गावचं पाणी
मह्या गावचं पाणी रं
गॉड गॉड लोक वाणी रं
न कसली व्हती लाचारी
सगळी कसी एक इचारी
पाण्यात कुठून घाण आली
गावची येस ओसाड झाली
गॉड गॉड लोक वाणी रं
न कसली व्हती लाचारी
सगळी कसी एक इचारी
पाण्यात कुठून घाण आली
गावची येस ओसाड झाली
मह्या गावचं पाणी रं
गॉड गॉड लोक वाणी रं
इरजुकिला सारा गाव
दुःखात असायचे सारे भाव
पाण्यात कोणी माती कालवली
क्षणात कसी सारी नाती हरवली
गॉड गॉड लोक वाणी रं
इरजुकिला सारा गाव
दुःखात असायचे सारे भाव
पाण्यात कोणी माती कालवली
क्षणात कसी सारी नाती हरवली
मह्या गावचं पाणी रं
गॉड गॉड लोक वाणी रं
नव्हती कसली जात पात
सा-यांची असे कामात साथ
पाण्याला धर्माची ग्लानी आली
भावबंदकी वादात अडकली
गॉड गॉड लोक वाणी रं
नव्हती कसली जात पात
सा-यांची असे कामात साथ
पाण्याला धर्माची ग्लानी आली
भावबंदकी वादात अडकली
मह्या गावचं पाणी रं
गॉड गॉड लोक वाणी रं
झोपडीला इश्वासाचा आधार
नव्हता पुढारपणाचा आजार
पाण्याला राजकिय किड लागली
इकासाची गाडी द्वाड बनली
गॉड गॉड लोक वाणी रं
झोपडीला इश्वासाचा आधार
नव्हता पुढारपणाचा आजार
पाण्याला राजकिय किड लागली
इकासाची गाडी द्वाड बनली
मह्या गावचं पाणी रं
गॉड गॉड लोक वाणी रं
होता सर्जा राजा ठेपात
बा गायचा कसा आनंदात
पाण्यात त्यांनी आग लावली
तहानलेली गावं खाक झाली
गॉड गॉड लोक वाणी रं
होता सर्जा राजा ठेपात
बा गायचा कसा आनंदात
पाण्यात त्यांनी आग लावली
तहानलेली गावं खाक झाली
© Raajoo Thokal
0 comments :
Post a Comment