इद्रोह
लंगोटीत व्हतो ना
तोवर कुणी नाही म्हणलं
मागास, अडानी, वनवासी
तोवर कुणी नाही म्हणलं
मागास, अडानी, वनवासी
डोंगरात व्हतो ना
तोवर कुणी नाही म्हणलं
लाचार, बेकार आदिवासी
तोवर कुणी नाही म्हणलं
लाचार, बेकार आदिवासी
रानात व्हतो ना
तोवर कुणी नाही बोम्बललं
कुपोषित, शापित वनवासी
तोवर कुणी नाही बोम्बललं
कुपोषित, शापित वनवासी
आता शहरात आलो
आता शाळेत आलो
आता हाफिसर व्हया लागलो
आता अन्याया इरोधात बोलतो
आता नेता म्या झालो
तं लागलं ह्यांच्या पोटात दुखाया
आता शाळेत आलो
आता हाफिसर व्हया लागलो
आता अन्याया इरोधात बोलतो
आता नेता म्या झालो
तं लागलं ह्यांच्या पोटात दुखाया
माझं गाणं चोरलं
माझं शेत ढापलं
माझ जंगल बळकावलं
माझं पाणी त्यांचं झालं
समदं कसं झ्याक केलं
माझं शेत ढापलं
माझ जंगल बळकावलं
माझं पाणी त्यांचं झालं
समदं कसं झ्याक केलं
आता वन्यजीव संरक्षणचा बहाना
आदिवासी नको ह्यांना हवा खजिना
कायदं त्यांचं त्यांच्याचसाठी
सरकार त्यांचं त्यांच्याचसाठी
आम्ही काय तर अन्यायाचे धनी
सरकार त्यांचं त्यांच्याचसाठी
आम्ही काय तर अन्यायाचे धनी
मग यांना सुचला पेसा
मग यांनी डावाला पैसा
इकास कसला डोंबल्याचा
आदिवासी खुपतोय यांच्या मनी
सावध आम्ही जंगलात व्हतो
ऐशोआरामात थोड़े सुस्तावलो
कायद्याचा फास पाहून धास्तावलो
आता हवं उलगुलान बोलू लागलो
ऐशोआरामात थोड़े सुस्तावलो
कायद्याचा फास पाहून धास्तावलो
आता हवं उलगुलान बोलू लागलो
तं चला इद्रोह कराया हवा रं दादांनो
हककांसाठी त्याग करु या रं बाबांनो
राजू ठोकळ
www.rajuthokal.com
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment