तू पड रे पड
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा असते उघड
तेव्हा पुजतात दगड
इथं नाही कोणी धड
जेव्हा असते उघड
तेव्हा पुजतात दगड
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा चालतो नांगर
तेव्हा पोखरतात डोंगर
इथं नाही कोणी धड
जेव्हा चालतो नांगर
तेव्हा पोखरतात डोंगर
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा राबतो शेतकरी
तेव्हा हसतो व्यापारी
इथं नाही कोणी धड
जेव्हा राबतो शेतकरी
तेव्हा हसतो व्यापारी
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा असतं सारं ग्वाड
तेव्हा तोडतात सारे झाड
इथं नाही कोणी धड
जेव्हा असतं सारं ग्वाड
तेव्हा तोडतात सारे झाड
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा येतं सरकारी लखुटं
तेव्हा लावतो आम्ही रोपटं
इथं नाही कोणी धड
जेव्हा येतं सरकारी लखुटं
तेव्हा लावतो आम्ही रोपटं
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा फुलते आमची बाग
तेव्हा रानाला लावतो आग
इथं नाही कोणी धड
जेव्हा फुलते आमची बाग
तेव्हा रानाला लावतो आग
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा नसतो दुष्काळ
तेव्हा तोडतो निसर्ग नाळ
इथं नाही कोणी धड
जेव्हा नसतो दुष्काळ
तेव्हा तोडतो निसर्ग नाळ
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा भरतात धरणं
तेव्हा बदलतात धोरणं
इथं नाही कोणी धड
जेव्हा भरतात धरणं
तेव्हा बदलतात धोरणं
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा भरलेला असतो हंडा
तेव्हा सारेच घालतात गंडा
इथं नाही कोणी धड
जेव्हा भरलेला असतो हंडा
तेव्हा सारेच घालतात गंडा
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा प्यायला असतं पाणी
तेव्हा पुजायला नसतं कोणी
इथं नाही कोणी धड
जेव्हा प्यायला असतं पाणी
तेव्हा पुजायला नसतं कोणी
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा कमी पडू लागल्या जागा
तेव्हा करपू लागल्या बागा
इथं नाही कोणी धड
जेव्हा कमी पडू लागल्या जागा
तेव्हा करपू लागल्या बागा
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा पैसा झाला प्यारा
तेव्हा देतात जमीन विक्रीचा नारा
इथं नाही कोणी धड
जेव्हा पैसा झाला प्यारा
तेव्हा देतात जमीन विक्रीचा नारा
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा वाहायच्या आमच्या नद्या
तेव्हा बंगल्यांच्या वाढल्या याद्या
इथं नाही कोणी धड
जेव्हा वाहायच्या आमच्या नद्या
तेव्हा बंगल्यांच्या वाढल्या याद्या
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
जेव्हा बहारदार होतं जंगल
तेव्हा केली विकासाची दंगल
इथं नाही कोणी धड
जेव्हा बहारदार होतं जंगल
तेव्हा केली विकासाची दंगल
तू पड रे पड
इथं नाही कोणी धड
इथं नाही कोणी धड
-Raju Thokal
0 comments :
Post a Comment