आमचं
आमचं भात गेलं
पावसानं माती झालं
पावसानं माती झालं
आमचं छप्पर गेलं
योजनेनं लक्तर तोडलं
योजनेनं लक्तर तोडलं
आमचं शात गेलं
धरणानं घात क्यालं
धरणानं घात क्यालं
आमचं डोंगर गेलं
फारिस्टानं घर नेलं
फारिस्टानं घर नेलं
आमचं गाव गेलं
विस्थापनानं नाव बुडालं
विस्थापनानं नाव बुडालं
आमचं कायदं बदललं
राजकारणानं वायदं केलं
राजकारणानं वायदं केलं
आमचं माणूसपण गेलं
माणसानं आदिवासीपण नासवलं
माणसानं आदिवासीपण नासवलं
आमचं सारं गेलं
सर्व्हेक्षणानं खरं लपवलं
सर्व्हेक्षणानं खरं लपवलं
आमचं साहित्य झोपलं
साहित्यकारांनं स्टेज हेरलं
साहित्यकारांनं स्टेज हेरलं
-विद्रोही आदिवासी
0 comments :
Post a Comment