बंगल्यातली फुले
तोडलेल्या झाडांचे रुदन कोण ऐकणार
उजाडलेल्या निसर्गाचे स्पंदन कोण जाणणार
उजाडलेल्या निसर्गाचे स्पंदन कोण जाणणार
रस्त्यावरच्या घोषणा ऐकून काय उपयोग
अंधारात तारे पाहून चालेल का हे जग
अंधारात तारे पाहून चालेल का हे जग
प्रगती दिसते पण त्यातील दरी कोण भरणार
संस्कृती जपतो पण माणूस कोण जपणार
संस्कृती जपतो पण माणूस कोण जपणार
पृथ्वीचं वास्तव विज्ञान उकळून कोण पिले
मोहमाया जमा करण्यात सारे संपुष्टात आले
मोहमाया जमा करण्यात सारे संपुष्टात आले
कोणाची न साथ लड़ाई लढावी लागणार
कोणी केला घात पलटवार करावा लागणार
कोणी केला घात पलटवार करावा लागणार
आश्रय नाही कुणाचा संघर्ष तुलाच तारणार
तुटले जरी हात आता तलवार तूच पेलणार
तुटले जरी हात आता तलवार तूच पेलणार
भाकरीचा चंद्र तुझा गिळला बघ कोणी
मातीतला अंकुर इथं जाळला बघ कोणी
मातीतला अंकुर इथं जाळला बघ कोणी
नाराज नको होऊ नजर कमजोर नाही
झोपडीच्या कुडाची ऊब शिरजोर नाही
झोपडीच्या कुडाची ऊब शिरजोर नाही
आग लागली आग, मनात वनात वणवा आहे
आगीतला आक्रोश न्यायाला भिडणार आहे
आगीतला आक्रोश न्यायाला भिडणार आहे
मुख्य प्रवाहाची भूख ओळखली आम्ही
विकासाची गोळा बेरीज जुळवली आम्ही
विकासाची गोळा बेरीज जुळवली आम्ही
अंधकार जड होतोय उजेडातल्या कळ्यांना
मानवतेची घुसमट समजेना बंगल्यात फुलांना
मानवतेची घुसमट समजेना बंगल्यात फुलांना
-Raajoo Thokal
0 comments :
Post a Comment