पेट रे मना समाजाचा तू हो ना
अज्ञान, गरीबीत हरवले हित
जगाच्या व्यवहाराची बघ रीत
हो पार्थ दाखव मार्ग जागृतीचा
पेट रे मना समाजाचा तू हो ना
जगाच्या व्यवहाराची बघ रीत
हो पार्थ दाखव मार्ग जागृतीचा
पेट रे मना समाजाचा तू हो ना
संस्कृती विचारांची श्रीमंती
जीवनात का हरवली नाती
दाखवून दे आदिवासी बाणा
पेट रे मना समाजाचा तू हो ना
जीवनात का हरवली नाती
दाखवून दे आदिवासी बाणा
पेट रे मना समाजाचा तू हो ना
बोगस, घूसखोर, घमेंडखोर
लाखो शत्रू सभोवती हरामखोर
कर उलगुलान बिरसाचा तू वारस
पेट रे मना समाजाचा तू हो ना
लाखो शत्रू सभोवती हरामखोर
कर उलगुलान बिरसाचा तू वारस
पेट रे मना समाजाचा तू हो ना
कुपोषण, उपोषण, भाषण
कष्ट करोनी समस्याग्रस्त जीवन
दे आधार तुला राघोजीची पुकार
पेट रे मना समाजाचा तू हो ना
कष्ट करोनी समस्याग्रस्त जीवन
दे आधार तुला राघोजीची पुकार
पेट रे मना समाजाचा तू हो ना
सुंदर मधुर संपन्न तुझे तन
घे पुढाकार तूच राख वन
डोंगर द-यात तंट्या तू बन
पेट रे मना समाजाचा तू हो ना
घे पुढाकार तूच राख वन
डोंगर द-यात तंट्या तू बन
पेट रे मना समाजाचा तू हो ना
-राजू ठोकळ
www.rajuthokal.com
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment