कविता संग्रह -राजू ठोकळ

मरण 


हाताशी आलेला भिजला आज गहू
मजुरीचे पैसे देण्या कुणाकडे पाहू
वर्षभराची नासली शिदोरी कुठे जाऊ
दावनीचे च-हाट हाती कसे गळा लाऊ

मर मर राबलो घामाची वाहिली गंगा
दुखाची काळरात्र उजाडली झालो नंगा
जगायचे मज लढा आता त्या निसर्गाशी
राजकीय धंदा खोटा सौख्य नको बेईमानाशी 

कापणीला बोट कापले रगात मातीत सांडले
रक्ताची ही नाती सारे जगणे डोळ्यात कोंडले
ढगांतुन बरसला पण डोळ्यांतुन अखंड वाहे
मरणाची संगत प्यारी गळ्याला आज फंदा राहे

माय-बाप राबले कनसरी नटली पुण्याई
अवकळा वरुणाची सारी बाटली कमाई
भुकेल्या पोटाला समजेना ही असहायता
रडणा-या पोराले उमजेना ही अगतिकता

सारे ऋतू कसे झाले दुष्मन आज बळिराजा
उभारती लव्हासा झाली निसर्गा पोरकी प्रजा
हरित डोंगर श्रीमंताला आंदन ही खरी गोम
निसर्ग पूजक हाकलले विकासाची ही गेम

झाडे तोड़ण्याची कशी सरकारला परवानगी
कु-हाड़ हातात गरिबाला तुरुंगात रवानगी
न्यायाची सारी भांडवली उन्मत्त सत्ता इथे
सरकारी धोरण देई  गरिबाला मरण इथे

तोडली झाडे कोणी नडली निसर्ग कृपा
झोडली झोपड़ी माझी पूजता वृक्ष बप्पा
वेळ ही कृतीची गरज वृक्षारोपणाची अशी
श्रीमंत योजनांना अडचण प्रकृतीची कशी
-राजू ठोकळ
http://www.rajuthokal.com
[5:39pm, 14/03/2015] 

राजनीति

खंडीच्या वरणात मुतला
सखा नित्याचा मातला
डोळा लावू मी कुठे कसा
मरणाची गाथा सांगू कसा

रोजच रडतोय तो धबाधबा
माझ्या नयनातुन वाहे धबधबा
अपेक्षाच आता संपल्यात
जीवनगाणे हरवले शिंपल्यात

पोशिंदा आज पाचुंद्याला महाग
सरकार सोडा निसर्गाची आग
जगण्याचा धंदा मोड़कळिस आला
पडल्या भिंती खावा भिजलेला पाला 

उभ्या पीकात पाणी जीव तुटला
सुटात मंत्री फोटू काढत सुटला
अनुदानाची आस लई त्रास देतीय
दु:खा परी खट्याळ राजनीति जड़ होतेय
-राजू ठोकळ
http://www.rajuthokal.com
[8:03am, 15/03/2015] 

●●●पूजा

ना कृष्ण से मुक्ति
ना राम की भक्ति
मै पूजता हूँ एकलव्य की शक्ति
ना गणपती से मुक्ति
ना सरस्वती की भक्ति
मै पूजता हूँ किताबों की शक्ति
ना गीता से मुक्ति
ना वेदों की भक्ति
मै पूजता हूँ प्रकृती की शक्ति
ना धर्मो से मुक्ति
ना मंदिरों की भक्ति
मै पूजता हूँ आदिवासी संस्कृती
ना पूजापाठ से मुक्ति
ना मूर्तियों की भक्ति
मै पूजता हूँ जंगल की शक्ति
-raju thokal
©www.rajuthokal.com
[5:48pm, 15/03/2015] 

दगड

दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
ठिणगी टाकुन पळाला
ठिणगीने आग दिली
आगीने ऊब दिली
ऊबेने जाग दिली
जगण्याची बांग दिली
दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
रस्ता दाखवून पळाला
रस्त्याने ध्येय दिले
ध्येयाने प्रयत्न दिले
प्रयत्नांनी जीवन घडले
दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
धरण बांधुन पळाला
धरणाने पाणी दिले
पाण्याने जीवन फुलले
दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
घर बांधून पळाला
घराने आधार दिला
आधाराने माणुस जोडला
यातून खरे जीवन घडले
दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
बुरुज बांधून पळाला
बुरुजाने स्वराज्य दिले
स्वराज्यातुन माणुस घडला
माणसाने समाज बनला
दगडा दगडा हात दे
जगण्याची साथ दे
एक दगड मिळाला
डोके फोडून पळाला
डोक्यातून रक्त वाहिले
रक्तातून अस्तित्व पाहिले
अस्तित्वाने जीवन दाखवले
दगडा दगडा ठेच दे
जगण्याची हाक दे
एक दगड मिळाला
जीवन घडवून पळाला
या घडण्याला अर्थ आला
माणुस जन्म सार्थ झाला
राजू ठोकळ
©www.vidrohiadivasi.in
[10:27pm, 16/03/2015] 

संस्कृती

संस्कारांची शिदोरी
निसर्गाला प्यारी
प्यारी माझी संस्कृती
ज्ञानाची चिंगारी
तत्त्वांनी भारी
भारी माझी संस्कृती
मायेचा पदर
सर्वांग सुंदर
सुंदर माझी संस्कृती
दुधावरली साय
लेकरांची माय
माय माझी संस्कृती
बाणावरला नेम
कष्टाचा घाम
घाम माझी संस्कृती
जखमेवर फुंकर
मातीतला अंकुर
अंकुर माझी संस्कृती
आनंदी समूह
नदीचा प्रवाह
प्रवाह माझी संस्कृती
पित्याचे लाड
घराची ओढ
ओढ़ माझी संस्कृती
रत्नांची खाण
स्वच्छंदी गाणं
गाणं माझी संस्कृती
पिल्लांचा दाणा
आदिवासी बाणा
बाणा माझी संस्कृती
©राजू ठोकळ
http://www.vidrohiadivasi.in
[12:40pm, 17/03/2015] 

 पहचान…

क्या ज़माना है देखो
आदिवासी आवाज
जहाँ भी सुनाई देती है
हजारो तूट पड़ते है
उसे आवाज दबाने के लिए…
हमारे अपने समाज का
गुरुर तो हर एक को है
आदिवासी तो नेक है
फिर उसकी आवाज से
इतना डरते क्यों  है
क्या भय हमारी आवाज का
क्या ऐसा जो किया हमने
क्यों नहीं सामने आने देते
क्या खौंफ इन्हें हमारी पहचान से…
आज तक लुट लिया
मनमानिसे बलात्कार किए
संस्कृती को सबने इस्तेमाल किया
लेकिन उसकी असली पहचान
हमेशा छुपाते रहे किताबो में
क्या त्यौहार बनाए हरामजादो ने
आदिवासी पराभव को नाचते है
हमारे भी अपने खो गए इन विचारों में…
जो सच बसा है मन मन में
जो सच छुपा है वन वन में
अब ओ दहाड़ बनकर
अब ओ पहाड़ बनकर
आ रहा सामने तो देखो
हजारो खड़े होते है
ओ आवाज को बंद करने के लिए…
लेकिन यह आवाज है संस्कृती की
अब यह आवाज है प्रकृती की
यही जरुरत है सपन्नता की
यही भविष्य बनेगी आदिम कल की
यह आवाज नहीं बल्कि
क्रांति बनकर सामने आ रही है
कब तक आप रोकोगे इसे
कब तक आप सच छुपाओगे
अब कलम की ताकद और
साहित्य की रेखाए मुठ्ठी में हमारे
देख लो अपने अतीत में
सच ना आप बर्दास्त कर पाओगे
आपका साहित्य खडा है
आदिवासी बदनामी पर
आप का इतिहास अधूरा है
आदिवासी उलगुलान से
कल नहीं सुनी थी यह आवाज किसीने
आज भी शायद आप नहीं चाहोगे
लेकिन कल की जरुरत आपको
समाज को मजबूर करेगी
सुननी पडेगी आपको मेरी कहानी
आप अपनी असली पहचान की भूख में
इसी आवाज को सलाम करोगे
डर इस बात का कही देर ना हो जाए
अपने ही अपनो से कही दूर ना हो जाए
जल जंगल जमीन संपदा के खातिर
कही मालिक यहाँ कमजोर ना हो जाए
लड़ाई तो हजारो वर्षो से है हमारी
आज अंजाम देना होगा एकता से
आदिवासी आवाज को बुलंद करना होगा
हमारी असली पहचान को बढ़ाना होगा।
आज दुश्मन हजारो सामने है
व्यवस्था पे कैसे भरोसा करे
हमारी आवाज के चलते शायद
सफेद कपडेवाले डरते राजनीति में
दूकान इनकी डूबती नैया है
जब हमारी आवाज बुलंद है
तो चलो मिलकर करे पुकार
आदिवासी उलगुलान…उलगुलान
राजू ठोकळ
http://www.vidrohiadivasi.in
[4:20pm, 18/03/2015] 

 दो कदम…

हमें अक्सर लोग पूछते है
क्या खफा है आपके जीने में
जो घुमते रहते हो गाँव शहर
क्या खफा है आपके सीने में
जो लड़ते रहते हो दुनियासे
क्या खफा है आपके मन में
जो लिखते रहते हो संस्कृति के वास्ते
क्या खफा है आपके तन में
जो बोलते रहते हो कविताओं से
क्या खफा है आपके जीवन में
जो उलगुलान कहते हो जी जान से
क्या खफा है आपके काम में
जो बोलते रहते हो हक़ के बारे में
क्या खफा है आपके संसार में
जो लड़ते रहते हो सरकार से
क्या खफा है आपके लब्जो में
जो प्रतिशोध उगलते हो विचारों से
तब मै भी साला क्या जबाब दे पाता
जो लड़ता रहता हु अपने आप से
एक लाईन हमेशा रखता हूँ सामने
समाज में देखता हु खुद को
तो अपने आप ये बाते आ जाती है।
समाज में दिखते है अपने संस्कार
तो अपने आप दो कदम चला जाता हूँ
लोगो में दिखते है मुझे मेरे माँ बाप
तो उनके लिए यह कर्तव्यता बनती है
-राजू ठोकळ
http://www.vidrohiadivasi.in
[9:42pm, 24/03/2015] 

 रीता पाऊस…

सुखाचा पाऊस
दुखाचा पाऊस
चिखल पाऊस
बेभान पाऊस
डोंगर पाऊस
नदीला पाऊस
वादळ पाऊस
गारांचा पाऊस
गढूळ पाऊस
पिकांना पाऊस
डराव पाऊस
घरावं पाऊस
पाहिला पाऊस
जाहली हौस
पैशाचा पाऊस
राहिली हौस
©आदिवासी मशाल…
[9:42pm, 24/03/2015] 

 पाऊल…

धनगरांना आदिवासी
आदिवासींना वनवासी
राजकीय सारीपाट रंगला
मूलनिवासी राजा माझा
डोंगर द-यात गंजला
धनगरांना आदिवासी
आदिवासींना वनवासी
कर्मट नितिचा हां घाला
निसर्गपूजक राजा माझा
उठ आता हाती घे भाला
धनगरांना आदिवासी
आदिवासींना वनवासी
आर्यांचा हां जुनाच कुटिल डाव
संस्कृतीसंपन्न राजा माझा
एकीचा मंत्र जपा करण्या पाडाव
धनगरांना आदिवासी
आदिवासींना वनवासी
उपरे होऊ पाहती मालक इथले
मुळमालक राजा माझा
जल जंगल जमीन हेच तुझे भले
धनगरांना आदिवासी
आदिवासींना वनवासी
संकट आज पुन्हा  कडकडले
स्वाभिमानी राजा माझा
कपट भेदण्या पाऊल पुढे पडले
©राजू ठोकळ
[9:24am, 25/03/2015]

 आदिवासी दहाड़…

सदियों फुलाते तकलीफ में है
मतलब गलतियों के साथ है
सुकून की जिंदगी के
सदियों से हम हकदार है
फूल खिलते पर्वत पहाडो पर
हसते खेलते हमारे हमसफर है
सिर्फ ना जल ना जंगल ना जमीन की
आज तो हमारे अस्तित्व की बात है
सूरज की धुप में जमीन की आग में
आजतक सलामत थी अपनी कुटिया
राजनीति के छल में भ्रष्टाचारी धुल में
आज भूख तले रो रही हमारी अखियाँ
नदियों से सिखा सदा हसमुख रहना
पंछियों से मिला नाचने गाने का गहना
सत्ता की मदमस्त भूख के मारे सालोने
तमाशा बना दिया आज जीवन अपना
लड़ाईया हजारो लड़ी शायद याद नहीं
दम आज भी कलाईयो में भूले हम नहीं
हक़ की बात अब हम हरदम करते रहेंगे
आदिवासी दहाड़ बनी चिंगारी रुकेगी नहीं
भूमि अधिग्रहण का तीव्र निषेध..
-राजू ठोकळ
[10:14am, 25/03/2015] 

●●●चला रे

हत्यारे उपसा रे
आलेत धावून धनगर रे
उठ आदिवासी तीर कमान काढ रे
हक्कांच्या रक्शणात उठ रे
राजकीय कुचेष्टा ठेच रे
होवू दे उलगुलान रे
आदिवासी रे
धाव रे
रान रे
पेटव पुन्हा रे
आले घुसखोर रे
तू कसा गप्प घरात रे
पोटाची खळगी अस्तित्व राख रे
भाड़खावु नेते स्वार्थी खुर्ची तू ठेच रे
तू हाय हक्कांचा मूलनिवासी हेच ज़रा सांग रे
अन्यायाची इथे आली कशी टोळधाड़ रे
आदिवासी कायद्याची पायमल्ली रे
तू ज़रा जाग आणि लढ़ पुन्हा रे
गीत आनंदाचे परी जाग रे
समर्पणाची वृत्ती दाव रे
अत्याचाराला रोख रे
तूच वीर बिरसा रे
तंट्या दाव रे
तू जागव रे
जाग रे
-राजू ठोकळ
[5:51pm, 25/03/2015]

●●●जब तक है जान

कहो आदिवासी महान
जब तक है शान
करो आदिवासी महान
जब तक है सन्मान
बनाओ आदिवासी महान
जब तक है ईमान
जिओ आदिवासी महान
जब तक है जान
बोलो आदिवासी मेरा महान
-राजू ठोकळ
[6:45pm, 25/03/2015] 

●●●●●●●●मुडदा…

आरक्षणाचा प्रश्न आम्हा रोजचाच झालाय
राष्ट्रवादी कांग्रेस कधी भाजपला ऊत आलाय
आदिवासी आहे मी लढाऊ बाणा आहे
घुसखोरांनो ! तुमचा मुड़दा पाडणार आहे
राबलेला, रापलेला, दुर्लक्षिलेला विद्रोह आहे
भटमान्य चक्रव्यूह कधी गद्दार आमचेच आहे
अन्यायाच्या पलिकडचा मी बाण सोडणार आहे
घुसखोरांनो ! तुमचा मूडदा पाडनार आहे
इतिहासाला कलमेने काळीमा फासलाय
आद्यविरांचा खोटा पुरुषार्थ लिहिलाय
रामधारी झाले बहु रावणाची शपथ आहे
घुसखोरांनो! तुमचा मुडदा पाडणार आहे
-विद्रोही आदिवासी
[7:18pm, 25/03/2015]

गाँव हमारे…

गाँव हमारे
उलगुलान पुकारे
सदियों की खामोशी
अब दुनिया को ललकारे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
सुख दुःख में पूजते
संस्कृती की लकीरे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
शिक्षा में उम्मीद
मशाल बनी नजरे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
लवासा में उजड़ते
प्रकृति के नज़ारे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
बिजली की कमी
विकास से हारे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
कुपोषण की समस्या
फल फूलो के मारे
गाँव हमारे
उलगुलान पुकारे
जमीन ना जल के हकदार
संघर्ष के लिए जागो रे
-Raju Thokal
[8:35pm, 27/03/2015] 

●●●धरम-करम….

ना घर है
ना डर है
ना जल है
ना फल है
ना कल है
ना बल है
ना जमींन है
ना जामिन है
ना एक है
ना हक़ है
ना संघर्ष है
ना हर्ष है
ना कलम है
ना मलम है
है तो सिर्फ गरीबी
है तो बहोत शराबी
चलो बताओ कहाँ है
हमारा अपना जहाँ है
संस्कृती हमारी धरम है
आदिवासी अपना करम है
-राजू ठोकळ
[9:32pm, 27/03/2015] 

●●●बलिदान…

प्रकृती रक्षकांचा मांडला असा खेळ
डोळ्यात आसू आणिबाणीची ही वेळ
लढा! आदिवासींनो काढा आता  दांडे
फेका पक्षीय राजकारणाचे उपरे झेंडे
बामणी विचार जपे मतांची फूस
सत्तेच्या खुर्ची प्रेमात पेरती  विष
लोमड़ीरूपी डाव साधे अधिकारी
उपटसुम्भ माजले तीरकमानची बारी
रामाच्या कपटाने झाले आदिवासी बरबाद
हिंदूरूपी भुताटकीने झाले हजारो बाद
निसर्ग कुशितला आमचा अबोल संसार
हाती घ्या शस्त्र माजले बिनबापाचे फार
नराधम अनेक बांडगुळ करी पाठराखण
आदिवासी जणू यांच्या बापाचे निशाण
आमचीही कुत्री लाळ घोळती लाचारी
मंत्रीपदासाठी माय राखोळी दुराचारी
धनुष्याखाली लपले आदिवासी घुसखोर
कमळाबाईने जपला वनवासी चमत्कार
घड्याळ दावती विकासाची दारे कुकर्मगती
एकीने लढा शिकलेल्या बांधवांना विनंती
आभाळ खुले जंगल डुले तुझ्या संगोपनात
भांडवलदार ठेवुनी डोळा तुझ्या कसे छपरात
दिला जन्म राखली संस्कृती आदिम उदरात
ग्रहण लागले आधुनिक भूमि अधिग्रहणात
कुणाच्या घराला तोरण तुझे असते मरण
वनसंपदा राखली पर्यावरणाची पाठराखण
सरकारी योजना खट्याळ मुळावर उठल्या
दाखवा लढाऊ बाणा आहेत मशाली पेटल्या
बिरसा लढला राघोजी गिरिकुरात हुतात्मे
आदिम इतिहासाचे नाही लिहिले महात्मे
आरक्षण मेहेरबाणी लाभली तुम्हा नोकरी
हक्कासाठी करा चला बलिदानाची तयारी

राजू ठोकळ
[6:57am, 28/03/2015]

●●●भविष्य…

रक्त खवळले
तख़्त हादरले
हक्क रक्षणा
युवा सरसावले
जल चोरले
जंगल लाटले
विनाश करण्या
सरकार बसले
शिक्षण घ्या पुरे
सत्तेचे रोखू वारे
जमीन वाचविण्या
लढू मिळुन सारे
झोपड़ी पाडली
जगाया नडली
रस्ते विकासात
पीढ़ी ही गाडली
जागृती करा
प्रकृती नारा
भविष्य राखु या
मिळुन लहान थोरा
©Raju Thokal
आदिवासी मशाल
[2:17pm, 29/03/2015] 


●●●असलियत…

संविधान का पालन नहीं करते
आदिवासी संस्कृती से है डरते
औकात नहीं सामना करने की
कानून की आड़ से हमला करते
जल जंगल जमिन की सौगंध आज
महलो से अन्याय करोगे यही हे राज
उलगुलान की चिंगारी लगा देगी आग
ख़त्म हो जाओगे गरीबी की होगी बाग़
ऐलान आपको हमारा अब सुनना होगा
संस्कृती के पालन पोषण को जानना होगा
मंदिरों के संग मदिरा अब खेल नहीं चलेगा
चर्च की दीवारों की असलियत आदिम बोलेगा
-राजू ठोकळ
http://www.vidrohiadivasi.in
[2:58pm, 29/03/2015]

रगात

रगात आटलं
काळीज फाटलं
मराण टांगलं
जगणं भंगलं
जंगल कापलं
पाणी हे पेटलं
मणकं मोडलं
पांग हे फेडलं
धर्माला रोखलं
अस्मितेत जगलं
संस्कृतीत वागलं
दूकान फोड़लं
मूर्तीला तोडलं
स्वत्व हे राखलं
जगनं हे चांगलं
-Raju Thokal
[5:48pm, 29/03/2015]

●●●●प्रायश्चित…

गावच्या रस्त्यानं
चालत बोलत खेळत शहरात गेलास
नौकरी का चाकरी
त्यावर भाजून भाकरी
सुटाबुटात मिरवाया लागलास
तुझ्या रुबाबात सुखावलो
भाव म्हणून गावभर मिरवलो
सुरुवातीला यायचा
गावभर फिरायचा
इचारपुस करून
आम्हाला आधार द्यायचा
तुझं पैकं नकोत
पण शब्दच मला अमृत होते
गाव तेच आहे
रस्ता पण त्योच हाय
अगदी त्ये खड्डे मोजुन घ्यावेत तसा
आता कुठं लाल डब्बा सुरु झालाय
पायी चालायची मज्जा
गावपण हरवून बसलाय
तुझं शहर खुप बदललं
तसा तू पण बदललाच
नाही तशी ती गरज हाय
पण माझी संस्कृती तुला
अडगळ वाताया लागलीय
झोपड़ी तुझ्या डोक्याला झोम्बाया लागलीय
जगण्याची उर्मी गोधडीनं दिली
तीच आता तुला टोचाया लागलीय
रस्त्यातले खड्डे
मातीतली माणसं
आता तुला परदेशी वाटू लागल्येत
बोलताना शब्द तुझे
कपात करू राहिलेत
तू बदलला ह्ये म्या लगेच हेरलं
चुकलेल्या गणिताची
मी गोळाबेरीज सावरत राहिलो
तू मात्र खेडूत म्हणून
आमची किंमत करत राहिला
अदानी-अंबानी शब्द पचवनारा तू
सहज आम्हाला अडाणी बोलू लागला
मर्जीला जागणारा मी
तुझ्या प्रत्येक किळसवाणीला
फाटक्या पदरात झेलू लागलो
आवंढा गिळत प्रयत्न केला
नात्याची गोधडी शिवू लागलो
पण अड़चन तुझी वाढत होती
संस्कारांची झोळी माझी
अपुरी पडत होती
ज्या रस्त्यानं तुझा इकास दिसला
त्याच रस्त्यानं पराभव मज दिसला
मी आजही तसाच आहे
तू मात्र शिकारी बनलास
कधी काळी येवून
निशाणा साधू राहिलास
लढा आता तुझाही आहे
लढा आता माझाही आहे
तुझं लढ़नं संपत्तीसाठी आहे
माझी लढाई संस्कृतीसाठी आहे
कोण जिंकेल कोण हारेल
दुःख माझ्या मनात पेरेल
तुझा पराभव हां माझाच आहे
माझा पराभव संस्कारांचा आहे
दोघांचा विजय मला हवा आहे
तुझ्या जगण्यात संस्कारांचं लेणं हवं आहे
मी घेतोय समजुन
मी घेतोय सारंच गिळुन
पण तू आता साहेब झालास
त्या रुबाबात हुकुम सोडाया लागलास
भावना, अस्मिता हे नाही तुझ्या कृतीत
AC ची हवा, लवासाची स्वप्ने
यामध्ये तुला मी दिसत नाही
विकासाच्या बुलडोझरखाली
तू सारं गाडल्याबिगर राहत नाही
जीर्ण माझे कपडे, हाड़कुळे माझे जगणे
माय मानलेली आपली जमिन संपदा
याचा आता तू धंदा केलाय
पैसा हाच तुला सर्वस्व झालाय
त्यात तू सारं बाजारात मांडलय
गि-हाईकाच्या शोधात तू
माझं जगणं वेशीवर टांगलय
जल जंगल जमीनीसाठी तू
मला नियोजनबध्द संपवलय
मी संपलो याचा आनंद तुला असेल
पण निट बघ तुझी झापड दूर सारून
मी संपत चाललोय म्हणून
आज निसर्ग संपत चाललाय
निसर्ग संपत चाललाय म्हणून
तुझ्या गळ्याचा फास आवळत चाललाय
ज्या रस्त्यानं तू गेलास
त्याच रस्त्यानं तू आलास
जाताना जगणं घेवुन गेलास
येताना मरण घेवुन आलास
मी अडाणी आजही खुश आहे
तू अदानीचा चाकर नाखुश आहे
तुझी भूक कधी भागणार नाही
माझ्या मरणानंतर तुझे काही चालणार नाही
जितकं जगलो त्यात समाधानी आहे
निसर्गाची माझी एक कहानी आहे
तुझं मर मर जगणं मला अनोखे आहे
त्यापरी हसत मरणे मला मंजूर आहे…
माझ्या मरणातुन उठतिल क्रांतिच्या ज्वाला
माझ्या जाण्यातुन पेटतील अनेक मशाली
त्या तुला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही
तुझ्या कर्माचे प्रायश्चित केल्याशिवाय
तुझे मरणही तुला शिवणार नाही…
-Raju Thokal
[7:39pm, 29/03/2015]

●●●●अमीरी-गरीबी

इन कागज़ के टूकडे पे
मरते हजारो लाखो है
इन कागज़ के टुकड़ो के लिए
मरते हजारो लाखो है
मरते है अमीर
जिंदगी के लम्हे भुलाकर
मरते है आदिवासी
जिंदगी के लम्हे जीकर
हो गई अमीरी अब
समस्या गरीबो की
हो गई गरीबी अब
रुकावट अमीरों की
हत्यार तो देखो
अमीरों के पास है पैसा
गरीब के पास है पेसा
लड़ाई तो अस्तित्व में है देखो
अमीर लेकर आते है
संविधान छोड़कर सरकार
गरीब आदिवासी क्या करे
संघर्ष के लिए है बेकरार
-राजू ठोकळ
[7:50pm, 29/03/2015]

●●●●
गरीब थे पर खुशहाल थे
आज गरीब भी नहीं और खुशहाल भी
आपकी स्वतन्त्रता और योजनाओं के कारण
आदिवासी हलाहल है…
जीने तो आप देते नहीं
और
मारने का काम खुलेआम करते नहीं….
चुपके से मार देते हो
नक्शलवादी कहकर गुन्हा छुपाते है आप
अपने विकास में असल में मार देते हो बाप
-राजू ठोकळ
[8:01pm, 29/03/2015]
●●●●


हम तो बोलते लिखते रहेंगे
मरने के बाद भी
आपसे लड़ते रहेंगे
-समाज व्यवस्था…
एकलव्य का अंगूठा
अब तुम्हे ठेंगा दिखा रहा रे
पहाड़ी में पले बढे
अब फंदा बन रहे धीरे धीरे
-राजू ठोकळ
[8:02pm, 29/03/2015]

●●●अंगार

कोई मुझे गाली देता है
कोई मुझे थाली से मारता है
कोई मुझे पैसा दिखाता है
कोई मुझे पेसा समझाता है
हम मर्जी के मालिक है
हम संस्कृती के मौलिक है
हम साहित्य के संस्कार है
हम विद्रोही आदिवासी अंगार है
-राजू ठोकळ
http://www.vidrohiadivasi.in

●●●शेर…

इतिहास के पन्ने पलटकर देख लो
शेरो की शिकार के निशान मिलेंगे
इतिहास की किताबे पढ़कर देख लो
शेरो की हिम्मत आदिवासी रखते है
शेरो की घटती संख्या समस्या बन गई
पर्यावरण के सामने रक्षा की चुनौती खड़ी हुई
अब शेरो की संख्या असरदार बढ़ रही है
जंगल की सुरक्षा महत्त्वपूर्ण बन गई है
सब का ख़याल है कानूनी अदालत में
आदिवासी बेदखल है शेरो की वकालत में
शेर तो सव्वाशेर बन रहे है आज कल
पेड़ पौधों के मालिक हटाए जा रहे आज कल
-राजू ठोकळ
[9:57pm, 30/03/2015]


अलिप्त नोकरदार…

मी आणि माझे कुटुंब
सुखात, आनंदात, बहरात
मी आणि माझे नातेवाईक
हसत, खेळत, सुखात लोळत
जगण्याचे सर्व मार्ग खुले
समस्यांना पैशाने कुम्पणाबाहेर रोखले
जीवन नोकरीने खुलले
पगाराच्या संगतीनं फुलले
मी बदललो, बहरलो, आनंदलो
गाडी आली मोठा बंगला आला
पोरांना महागड्या शाळा मिळाल्या
कपडे, बोलणे, वागणे सारे बदलले
बँकेत खुप सारी माया जमवली
आदर, मान, सन्मान मिळाले
सारं जे हवं ते मिळालं
आरक्षणाचं गणित योग्य जुळलं
फ़ायदा जो समाजाला हवा होता
तो मी माझ्या कुटुम्बात घेतला
समाजाला कुम्पणाबाहेर ठेवून
आज मी जगाला कवेत घेतला
समाजाच्या व्यथा
संस्कृतीवरील पाशवी आक्रमणे
घुसखोरांची झुंडशाही
सरकारी योजनांचा करंटेपणा
नेत्यांची घुसखोरीला फूस
कुपोषण, उपोषण, शिक्षण
विस्थापन, भूमि अधिग्रहण
असं काहीच दिसत नाही मला
झळ सा-याची नाही बसत
बाजारात सारं घेतो विकत
श्रमाच्या आणि अश्रुंच्या धारा
कष्टकरी बांधवांच्या जखमा
कुपोषणाने मरणारी बालके
बलात्कार, अत्याचार हे बघतो
नित्याच्या जगण्याचा भाग म्हणून
सारं बोथट वाटतं…
मनाला सारं खोटं वाटतं…
हसतो कधी
सहानुभूति कधी….
अन्यायाच्या जानिवेतुन
घुसखोरिच्या रागातुन
सरकारी योजनांच्या त्रागातुन
वनविभागाच्या त्रासातुन
आता तुम्ही काढता मोर्चे
मी मात्र अलिप्त
कुंपण घराचे
बंधन मनाचे
ज़रा संकुचित झालेय….
तुम्ही काढा मोर्चे
लाठीहल्ला पण तुम्हीच खा
उपासमार झेलत निषेध करा
आम्ही आहोत निर्धास्त
आरक्शणाचे फायदे लूटत
आयत्या बिळावर नागोबा
तुम्ही लढा कारण
खरी गरज तुम्हालाच
तुम्हीच मरा कारण
जगायला काहीच नाही…
तुमचा स्वाभिमान
तुमची अस्मिता
तुमची संस्कृती
तुमच्या परंपरा
आता माझ्या नाहित
मी अलिप्त नोकरदार
जगाच्या बाजारात
मी सरकारी वफादार
जगाच्या व्यवहारात…..
-राजू ठोकळ
30/03/2015
http://www.vidrohiadivasi.in

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.