आम्ही चुकलेली वाट गडवाट – कधी एकदा २७/०७/२०१४ रविवार येतोय अशी अवस्था माझ्या मित्रपरिवाराची झालेली रोज कुणीना कुणी फोन करून विचारनार, सकाळीच ५ ला सर्वांचे फोन आवारावर, समशेरपूर वरून ६ला निघालेली बस ६.३०ला गर्दणी मार्गे ७वाजता अकोल्यात पोहोचली एकेक सर्व सवंगड्याना घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला रोडने सर्वांची ओळख एकेकाने करून दिली. ओळखपरेड बी.एस.एफ यांनी छान करून दिली आणि यावेळी सोबत असलेले व्याख्याते श्री योगेश नागरे पाटील यानी बी.एस.एफ यांच्या आग्रहास्तव किल्ले जंजिरा कसा शेवट पर्यंत अभेद्य राहिला याची माहिती सर्वाना दिली. यावेळी प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर अगदी प्रभावीपणे मांडली. हा प्रश्न उत्तोराचा तास अगदी रतनगडाच्या पायथ्याशी येवून थांबला.. अमृतेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन थोडी पोटात भर टाकून रतनगडची वाट धरण्याचा मनासुभा नागरे पाटलांनी मांडला. तो पर्यंत ओतूर वरून राजू गाईड ( श्री राजू ठोकळ सर) व साकुर मांडवे वरून श्री ईश्वर सहाणे आपापल्या फोज फाट्यानिशी रतनवाडी मध्ये मिळाले. मग पुढचा प्रवास सुरु झाला. ४० ते ४५ . रतनगड मोहीम सुरु करताना पाऊस सुरु झाला. आणि धुक्यातून जाताना आमची वाट चुकली.. खरा थ्रिलर अनुभव सर्वांनी अनुभवला काट्यातून प्रवास करतानाचा प्रवास मला वाटत सर्वांच्या अगदी शेवट पर्यंत लक्षात राहील... गड राहिला एकीकडे आम्ही मात्र भलतीकडे... पण सर्वांनी धुक्यातून एकमेकांना योग्य ते सहकार्य करून योग्य ती मार्गक्रमण केले... राजू गाईड यांनी एका ठिकाणी सर्वाना थांबवून स्वतः ( फुकट त्यांना गाईड म्हणत नाहीत ) २ किमी चा टप्पा पार केला वाट शोधली आणि परत येवून सर्वाना सोबत घेवून पुढील वाटचाल सुरु केली.. आणि धुक्यातील प्रवास वरून पाऊस आणि सोबतीला गरचींब अंगाला झोबनारा वारा व गायकवाड डॉक्टररांनी (वय ४५ पण सर्व तरुणांना लाजवेल असा रुबाब) विविध गडकिल्ल्यांची मार्गदर्शनातून माहिती दिली... शेवटी गुहेत सर्व जमले... पूर्ण गडाला चक्कर द्यावी असे ठरले पण कल्याण दरवाज्याजवळ जाता क्षणी सर्वांनी परतीचा निर्णय घेतला कारण वारा खूपच जोरदार होता तेथे कुणा नवख्याचा निभाव लागणार नाही याची खात्री प्रत्येकाला पटली. गुहेत एकत्र जेवण झाली आणि पावसात वाऱ्याला सोबत घेवून परतीचा प्रवास सुरु झाला...गड अर्धा उतरल्यावर श्री सागर शिवते पाटील यांनी दांडपट्टा आणि तलवारबाजी करून आमच्या सोबत, इतर पर्यटकांना नजरेने खिळवले.. नारळ फोडणे. काकडी कापणे, केळी कापणे... मला वाटत असा अनुभव परत घेणे शक्य नाही. कायम आठवणीच्या कप्यात कायम स्मरणात राहील.... सर्व जन गड उतरल्यानंतर खूपच आनंदी होता... प्रत्येकाच्या तोडी एकच चर्चा होती.. अशीच इव्हेंट हवी... “ चुकू पण शिकू “ सांगणारी.... आमचे मित्र बी.एस.एफ., शिवचरित्राचा गाढा अभ्यास असणारे श्री.योगेश नागरे पाटील आणि दत्तुभाऊ बेणके यांच्या उत्तम नियोजनातून रतनगडची २७/०७/२०१४ रोजी रविवार पाहून इव्हेंट टाकली उत्तम प्रतिसाद मिळाला. ओतूर वरून राजू गाईड ( राजू ठोकळ सर ) आपल्या मित्रांना आणि सोबत घेऊन आले. साकुर मांडव्यावरून श्री ईश्वर सहाणे पाटील आणि सोबत डॉक्टर गायकवाड साताऱ्यावरून श्री सागर शिवते ( तलवारबाजी, दांडपट्टा उत्तम हाताळणारा मावळा) आणि आमच्या सोबत श्री. वाकचौरे सर, श्री.योगेश आवारी, श्री.योगेश नागरे पाटील, श्री. दत्तुभाऊ बेणके, श्री. बबन शिंदे श्री. अनिल नाईकवाडी आणि आमचा मोठा मित्रपरिवार होता.... या इव्हेंट निमित्ताने सांगायचे झाल्यास “मला अनेक नवीन मित्र मिळाले पण ते सर्व कधी न दुरावा देणारे”
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments :
Post a Comment