आदिवासींवर अनेकांनी लेखन केलेले आहे. परंतु आदिवासी म्हणून सुनील गायकवाड यांनी केलेले लिखाण अधिक मौलिक आहे. कारण त्यांनी जे जीवन अनुभवलेले आहे, जगलेले आहे, तेच आपल्या लेखणीतून मांडण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
आदिवासींच्या मनाचा व वेदनांचा अचूक ठाव कजगावचे शिक्षक सुनील पौलाद गायकवाड यांनी आपल्या साहित्यातून घेतला आहे. ते एका आदिवासी गरीब कुटुंबात जन्माला आलेले असल्याने त्यांची परिस्थितीने घेतलेली परीक्षा आणि आयुष्यात झालेला संघर्ष यातून त्यांची साहित्यिक म्हणून जडणघडण झालेली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेल्या संवेदना ह्या अस्सल असल्याने त्यांची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. तसेच महत्वाचे समजल्या जाणाऱ्या पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची त्यांना संधी मिळाली. एवढेच नाही तर त्यांच्या साहित्याची दखल घेऊन थेट हिमाचल प्रदेश सरकारने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांनी आपल्या परीसरात व आयुष्यत घडलेल्या रंजक गोष्टींवर प्रखरपणे लिखाण केले आहे. आदिवासींच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजासमोर मांडली आहे. आदिवासी समाजाने सुशिक्षित व्हावे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात काहीं निवडक आदिवासी कविमध्ये त्यांचा समावेश होतो. साहित्यिक सोबतच कजगाव हिरण विद्यालयात एक शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आदर्शवत ठरली आहे. विद्यार्थ्यांना आपलेसे करणारे विशेष गुण त्यांच्यात दिसून येतात. त्यामुळे कर्तव्यावर असतांना नेहमी ते आपल्या विद्यार्थ्यांच्या गराड्यात दिसून येतात. त्यांच्या साहित्याची दखल जिल्हा, राज्य व देश पातळीवर घेण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक मान्यवर लेखकांच्या पंक्तीत यांचं नाव घेतलं जाईल इतके लिखाण त्यांनी केलेले असून चाळीसगाव येथील भाषेला पुस्तकरूपाने जनतेसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम देखील त्यांनी जबाबदारीने केलेले आहे. आपले लेखन करत असताना त्यांनी संस्थापक अध्यक्ष, आदिवासी साहित्य अकादमी, महाराष्ट्र यातही योगदान दिलेले आहे.
आदिवासी संवेदना आपल्या लिखाणातून मांडत असताना त्यांनी विविध प्रकारच्या लेखन शैलिंचा प्रभावी वापर केलेला आहे.
त्यांचे पुस्तक लेखन आपणास माहीत असणे आवश्यक आहे. आदिवासी साहित्यिक जन्माला येणे ही समाजाची गरज आहे. त्यासाठी सुनिल गायकवाड यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य समाजातील तळागाळात पोहचणे आवश्यक आहे.
• हिंदी उपन्यास
1.डकैती देवसींग भिल के बच्चे
• मराठी उपन्यास
1.मासोळी (मछलि )
• कहानीसंग्रह (मराठी )
1.भौगऱ्या 2012
2.गल्लुर 2017
3.कोलदांडा 2021
4.भिलाटी 2024
• काव्यसंग्रह
1.पावरी (भिलाऊ आदिवासी भाषा में )
2.कोयता (भिलाऊ आदिवासी भाषा में )
• आत्मकथा (जीवनी )
1.बाडगी नी धार
• संशोधन
1.भिलाऊ आदिवासी लोकसाहित्य आणि ईतिहास
सुनिल गायकवाड यांनी केलेल्या लिखाणाची दखल विवीध पातळीवर घेण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यातील जयपाल ज्यूलियस हन्ना राष्ट्रीय आदिवासी साहित्य पुरस्कार रांची (झारखंड ) व भूमीजन साहित्य पुरस्कार औरंगाबाद (महाराष्ट्र ) हे प्रामुख्याने उल्लेख करण्यासारखे आहेत.
त्यांच्या लिखाणातील काही साहित्य अभ्यासक्रमात सहभागी होणे ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. त्यांचे खालील साहित्य हे अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आलेले आहे.
1) ' वेटर ' कहानी प्रताप महाविद्यालय (स्वायत्त )अमळनेर में एफ .वाय .बि .ए .पहले सेमिस्टर में ...
2) वाघूर ' कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव के एम .ए .के लिये ...
3) भौगऱ्या ' कहानी डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद महाराष्ट्र.
त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांचे सदस्य म्हणून देखील काम पाहिलेले आहे.
आज पर्यंतच्या प्रवासात त्यांनी विविध संमेलनात सहभागी होऊन काव्यपाठ व कहाणीपाठ सादर केलेले आहेत.
त्यांनी सहभाग घेतलेले काही प्रमुख कार्यक्रम
1.भद्रवाह ,जम्मू कश्मीर
2.धारियावाद ,राजस्थान
3.नेत्रग ,गुजराथ
4.साहित्य अकादमी दिल्ली
5.भुवनेश्वर ,ओडिशा
6.कोलकाता ,पश्चिम बंगाल
7.सिल्वासा ,दादरा नगर हवेली
8.अथोला ,दिव ,दमण
9.रांची ,झारखंड
10.फोंडा ,गोवा
फक्त साहित्य निर्मिती किंवा कार्यक्रमात सहभाग घेणे इतकेच त्यांचे कार्य मर्यादित नसून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलेले आहे. त्यातील काही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा उल्लेख होणे आवश्यक आहे. त्यांनी आज पर्यंत 5 राज्यस्तरीय आदिवासी मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन यशस्वीपणे केलेले असून ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत :
1.टाकळी ,चाळीसगांव 2013
2.भडगाव 2014
3.कजगांव 2015
4.मेहूणबारे 2017
5.वडजी 2019
सुनिल गायकवाड यांचे साहित्य आपल्या संग्रही असायलाच हवे असे आहे. त्यांचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे....
• कथासंग्रह
---------------
1.भौगऱ्या :- मूल्य - 140
2.गल्लुर :- मूल्य - 140
3.कोलदांडा - मूल्य -150
4.भीलाटी - मूल्य - 200
5.तारपा -मूल्य - 200
• काव्यसंग्रह -
---------------
1.पावरी - मूल्य -100
2.कोयता - मूल्य - 120
• कांदबरी
1.मासोली - (मराठी ) - 150
• आत्मकथा
1. बाडगी नी धार मूल्य - 150
• संशोधन
भीलाऊ आदिवासी लोकसाहित्य व ईतिहास - मूल्य 200
• उपन्यास
1.डकैती देवसिंग भील के बच्चे (हिंदी )- 200
2.English Novel :-ROBBERY :- Pr.450/
• संमेलनाध्यक्ष भाषण
1.पाचवे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन वडजी - 50
(आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र आयोजीत )
2.पहिले राज्यस्तरीय आहीराणी साहित्य संमेलन कल्याण -50
(खान्देश संग्राम मुंबई आयोजित )
त्यांची आगामी कांदबरी संघटना ही देखील लवकरच प्रकाशित होत असून तिचे स्वागत मूल्य 250 रुपये आहे.
त्यांच्या लिखित पुस्तकांचा संच केवळ 2550 रुपयांना उपलब्ध असून आपण तो खरेदी करावा अशी Aboriginal Voices परिवाराकडून विनंती करण्यात येत आहे.
त्यांचे साहित्य खरेदी करण्यासाठी
मो . 7768030445 / 8208908681
या नंबरवर संपर्क करू शकता.
© Raajoo Thokal
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment