आपल्या तमाम आदिवासी जमातींचे भूषण, स्वाभिमता, अभिमान असणारे फुलवडे या आंबेगाव तालुक्यातील गावात 1950 साली जन्मलेले रामचंद्र चिमाजी जंगले कवी, साहित्यीक, समाजसेवक व विचारवंत यांना आजवर 65 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले असुन त्यांना अनेक प्रकारच्या उपाधी देऊनही सन्मानीत केलेले आहे. आजवर 70 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन व प्रकाशन केलेले हे बहुआयामी आदिवासी व्यक्तिमत्त्व समाजातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेले आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक प्रतिष्ठेचे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी आदिवासी समाज, साहित्य, शिक्षण भूषण, साहित्य गौरव- भूषण, रत्न, भाषा गौरव महाराष्ट्र शिवरत्न, ठाणे ज्येष्ठ रत्न, राष्ट्रीय मानवसेवा, डॉ.बाबासोहब आंबेडकर पुरस्कार, नॅशनल आयकॉन, पद्मश्री मणीभाई देसाई, राष्ट्रसेवा पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार, ग्रामभुषण सह्याद्रीभुषण, भाषाभुषण पुरस्कार, क्रांतीगुरु लहुजी साळवे गुणीजन कवीरत्न पुरस्कार असले अनेक प्रतिष्ठेचे सन्मान, पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
याचबरोबर मानाचा तुरा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे दि ग्रेट इंडीयन, सर्वाधिक काव्य लेखन करणारा आदिवासी कवी – राष्ट्रीय रेकॉर्डस् म्हणून त्यांची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कोरोना- देव देवतांचा नैसर्गिक मृत्यु या दिर्घकाव्यालाही महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसने राज्यस्तरीय सर्वात लांबीचे काव्य म्हणुनही सन्मानित केले आहे. त्याचबरोबर कोविड-19 योध्दा हा अवॉर्डस् ही या कविता संग्रहाला प्राप्त झालेला आहे.
इतकी मोठी साहित्य संपदा असलेल्या व्यक्तीची ओळख समाजास होणे आवश्यक आहे. आदिवासी संस्कृती मूल्ये जपणारी त्यांची पुस्तके समाजात पोहचली पाहिजेत. त्याची जबाबदारी खरं तर आपली सर्वांची आहे. चला तर मग या अस्सल आदिवासी साहित्यिकास आपण समाजापर्यंत पोहचवू या. या जेष्ठ -श्रेष्ठ आदिवासी कवीचे अनेकानेक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील समाजकार्यास आणि काव्य लेखनास तमाम आदिवासी समाजाकडून शुभेच्छा!
या ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकाशी संपर्क साधण्यासाठी व त्यांच्या अलौकिक अशा साहित्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी +91 84119 34737 या नंबरवर संपर्क साधू शकता.
- राजू ठोकळ
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment