स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जव्हार संस्थानचे तत्कालीन राजा श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांना 1 एप्रिल 1960 रोजी पत्र लिहून जव्हार संस्थांनने उद्योग क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरीचे कौतुक केले होते. हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची जबाबदारी पंडित नेहरू यांच्या विनंतीवरून पार पाडताना श्रीमंत महाराज यशवंतराव मुकणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सदर पत्र लिहिले होते. जव्हार संस्थानच्या दृष्टीने ही एक मानाची बाब आहे.
यांनी उद्योग क्षेत्रात भरीव काम करताना दूरदृष्टीने जव्हार संस्थानात देखील विविध उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु दुर्दैवाने नंतरच्या काळात जव्हारच्या या औद्योगिक कामगिरीत भर घालण्यात येथील नेतृत्व कमी पडले व आज जव्हार, पालघर, डहाणू परिसराची वाताहत झालेली पाहायला मिळत आहे. सध्याचे महाराज श्री महेंद्रसिंह मुकणे यांनी जव्हार नगरपरिषदेला जय विलास राजवाडा येथे पाणी पुरवठा करण्याबाबत अनेकदा पत्र देऊनही संघर्ष करावा लागत आहे.
जव्हार संस्थानचा गौरवशाली इतिहास जागृत झाल्याशिवाय या उदासिनतेमध्ये बदल होणार नाही. ज्या व्यक्तींना आपल्या इतिहासात रुची आहे, त्यांनी पुढाकार घेऊन जव्हार संस्थानच्या इतिहासावर काम करणे आवश्यक आहे. हा आपला अभिमान जागृत करण्यासाठी चला पाऊल टाकूयात....
राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment