आयुश म्हणजे एक प्रवाह......आदिवासी विचारांचा संगम आणि
संवर्धन.......
आयुश म्हणजे एक आयुष्य.......आदिवासी कलेने उलगडलेले......वारली
चित्रकलेतुन साकारलेले....!
आयुश म्हणजे भावना......आदिवासी पायांना बसणा-या वेदनांची
संवेदना.......!!!
आयुश म्हणजे आवाज.......धरणात गेलेली जमीन पाहून हताश व्यक्तीला उभे
राहण्याचे बळ......!
आयुश म्हणजे हाक........आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपल्या
योगदानाची अपेक्षा....!
आयुश म्हणजे विश्वास.......शिक्षण पूर्ण झाल्यावर आता काय या
प्रश्नाच्या उत्तरासाठी आपलाच एक म्हणून केलेली विचारपूस.....!
आयुश म्हणजे प्रेरणा......आश्रमशाळा एका बाजुला खानावळी ठरत असताना
त्यात घडून आम्ही देशाचे नेतृत्व करू शकतो हां विचार....!
आयुश म्हणजे स्पंदन......मी मनात तुझे दुःख जाणलेली धकधक......!
आयुश म्हणजे आपण सर्व......आदिवासी हित आदिवासी दृष्टिकोणातुन असा
ठोस निर्धार....!
आयुश म्हणजे मी आणि तू.......एक परिवार.....सामाजिक बदलासाठी एकीचे
बळ...!
आयुश म्हणजे आमची शान......आया मना धान दे चे गाण....!
आयुश म्हणजे सुरुवात......कोवळ्या सूर्यकिरनांगत आदिवासीपणाची ऊब...!
आयुश म्हणजे मेळघाटातील कोरकू आदिवासी.....त्याचे औषधी वनस्पतींचे
ज्ञान.....गाविलगडचा आदिवासी साम्राजाचा किल्ला.
आयुश म्हणजे जव्हारचे मुकणे संस्थान......राजवाड्याचे
वैभव........काजूच्या बागेतून जपलेले शेतीचे व्यावसायिक धोरण.
आयुश म्हणजे डहाणूची महालक्ष्मी......तारपा,
ढोल, तूर नाच........आदिवासी नृत्यांतून होणारे संस्कृती दर्शन आणि
संवर्धन.
आयुश म्हणजे वीर खेमा नाईक......... शिवनेरीचा विजय......बलिदान
दर्शविणारा कोळी चौथरा..!
आयुश म्हणजे नाही कुणाचे गाव.......आदिवासी युवा शक्ति हीच ओळख आणि
कार्य आदिवासी हेच नाव....!