‘बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी’
आदिवासींचे आदिवासी संस्कृतीबरोबर हरवत
चाललेले आदिवासीपण जपणारे साहित्य काही प्रमाणात आज आदिवासी लेखक, कवी,
चित्रकार आदी साहित्यिकांकडून जोपासले जात आहे याचा एक आदिवासी या नात्याने
आयुश परिवाराचा एक सदस्य म्हणून मला आदिवासी सामाजिक कार्यात अधिक ऊर्जा देते आणि माझ्या कामाचा वेग अधिक वाढतो.
नुकतेच मी डॉ.गोविंद गारे यांचे ‘बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी’ हे पुस्तक वाचले. कोणतेही पुस्तक असो, ते जर आदिवासी बांधवाने आदिवासींविषयी लिहिलेले असेल तर ते पुस्तक वाचण्यात मी अधिक धन्यता मानतो.
या पुस्तकामध्ये कोकणा आदिवासींचे सामाजिक व आर्थिक जीवन अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्णपणे शब्दबद्ध केलेले आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आदिवासींच्या पराक्रमी इतिहासाची पाने जगासमोर आणण्याचे काम डॉ.गोविंद गारे यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढयापूर्वी इंग्रजांविरुद्ध आदिवासी जमातींनी अनेक ठिकाणी जे लढे उभारले होते त्याची माहिती वाचताना तर अंगावर शहारे येत होते. आदिवासी म्हणून अंगावर रोमांच उभे राहत होते. तथाकथित इतिहासात चुकूनही न सापडणारे आदिवासी क्रांतीकारकांचे उल्लेख मग यामध्ये….
हि-या नाईक(१८२२),
शिवराम लोहार(१८२५),
डांगचे राजे प्रतापसिंग (१८४०),
राघोजी भांगरा (१८३८-१८४८),
खाज्या नाईक (१८३१-५१),
कुंवरसिंग वसावा (१८४१),
उमाजी नाईक,
भागोजी नाईक (१८५५-१८५९),
भीमा नाईक, काजीसिंग (१८५७),
उमेड वसावा,
पेठचा भाऊराजा (१८५७),
देवजी राऊत (१८५७)
वाचावयास मिळाल्याने एक वेगळेच समाधान मनात निर्माण झाले होते.
या पुस्तकात कोकणा आदिवासींचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन, लोकसंस्कृती, लोकजीवनातील मौखिक परंपरा, कोकणी बोली, कोकणा समाजाच्या विकासाचे दीपस्तंभ, बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी आणि आदिवासी परिवर्तनाच्या दिशा आदी घटकांचा अतिशय समर्पक मागोवा लेखकाने घेतलेला आहे. एकंदरीत डॉ.गोविंद गारे साहेब यांची पुस्तके वाचणे माझ्यासारख्या वाचकाला एक मेजवानीच ठरते. आपणही नक्की या पुस्तकाचे वाचन करून आदिवासी समाजाच्या माहितीची भूक भागवावी.
श्रीविद्या प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक आपण नक्की वाचावे हि विनंती. पुस्तकाचे मूल्य १५० रुपये आहे. पुस्तक आज दुर्मिळ आहे. परंतु जर कुठे उपलब्ध असेल तर हा खजिना आपण नक्की आपल्या संग्रही ठेवावा असाच आहे.
©www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment