आदिवासी भूक…
सा-यांचीच भूक येथे गरीब हायआदिवासी कष्टात राबत जाय
कंद-मुळे होती सुखाची आगरे
केले वनवासी तू आता तरी जाग रे
आदिवासी मग तो कोणत्याही जमातिचा असो…..कोणत्याही प्रांतातील असो सर्वांच्या समस्या सारख्याच आहेत. त्यात आज सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतुक, शेती, इतर व्यवसाय अशा विविध पातळिवर आदिवासिंच्या अज्ञानाचा गैरफ़ायदा घेतला जातो. पूर्वी जंगल संपदा भरपूर असल्याने आदिवासी समाज बांधव आपले जीवन आनंदात जगत होते. परन्तु काळाच्या ओघात नतभ्रष्ट सरकार व शासनव्यवस्थ्येने जंगलाबरोबर आदिवासींनाही रस्त्यावर आनले. राज्यघटनेत आदिवासी शब्द वापरणे अपेक्षित असताना अनुसूचित जमाती असा उल्लेख करण्यात आला. आदिवासी शब्दाला खुप प्राचीन इतिहास आहे. यातून आदिवासींचे येथील अस्तित्व स्पष्ट होते. परंतू अनुसूचित जमाती असा उल्लेख करून आदिवासिंची प्राचीन ओळख पूसण्यात आली. आज आदिवासींना वनवासी म्हणून अवहेलना केलि जाते. निवडनुकीच्या काळात फक्त मतांचे राजकारण आमच्या माथी मारले जाते. सकारात्मक निर्णय मात्र आमच्या नशिबात नाहीच की काय अशीच अवस्था सर्व आदिवासी बांधवांची आहे. म्हणून आपली स्वताची ओळख प्रभावीपणे मांडन्यासाठी प्रत्येक आदिवासी युवक पुढे आला पाहिजे.
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment