आदिवासी व्यथा
पावसाची कुतर घाई....माझी दारिद्र्याशी लढाई
पोरा-बाळांसाठी करी निसर्गाशी दिलजमाई
नेहमीच बंधनात.....संकटात
कसा दिसेल मी सुटाबुटात
डोंगराशी नातं...परी अज्ञानाची लाथ
कष्टाया धरणी मायलेकराची साथ
कडधान्याचे पीक...घरी समस्यांचा ऊत
डाक्टर सोडून भगताशी नातं
जंगलाचा अधिवास...सात जन्माचा वनवास
सरकारी धोरणांचा असे बेगडी सहवास
शिक्षणाचं दुकान...आश्रमशाळेचा मकान
पगाराचे गुरुजी आमच्या शासनाचं भूषाण
घुसखोरी जपली....शासनाने इज्जत विकली
ख-या आदिवासीला देई केराची टोपली
संस्कृती महान....पण हा देह टाकला गहाण
प्रगतीचा सूर्य देखण्या पायी नसे वहान
भूमिहीन गा-हाणे.....पूजली मुळावरच धरणे
भिक नको हक्काचेच फक्त मागणे
पोरं शिकली.....पांढरपेशांच्या दावणीत बांधली
मोठ्या पगारात त्यांना लाचारीच मानवली
गरिबी हक्काची.....तरी दारू मिळे बाराची
मतदानाच्या पैशासाठी पर्वा नसे समाजाची
आख्खं शिवार जपलं....नशीब मेलं फाटलं
जन्मासोबतच माझं अस्तित्व ठेकेदारांना विकलं
अस्तित्वाची जाण....आज गातो मी गुणगान
माझ्या प्रत्येक श्वासातून जपतो आदिवासी शान..!!!
©www.rajuthokal.com