आदिवासी संस्कृतीची मराठी रंगभूमीला पडलेली भुरळ
”नभ उतरू आलं!
चिंब थर्थर बन
अंग झिम्माड झालं !
हिरव्या बहरात.”
अशा या ओवी सदृश छन्दातून, अनोख्या प्रतिमांतून निसर्गाच गीतसाकारलं. यातून निसर्ग आपल्याला भावतो. या गीतातून निसर्ग प्रेमाची साक्ष पटते.
” डोंगर काठाडी
ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी.”
किंवा
”डोंगर देहावरी
रात्र फिरते अंबारी
देवाजीच्या डोईवरी
मेघुटांची वारी.”
ह्या सारख्या गीतांमधून ठाकरवाडीचे वर्णन तर येतेच; पण ठाकर समाजाच्या अंतरमनात असलेल्या लीन्गोबाचे आणि त्याच्या डोक्यावरील ढगांच्या गर्दीचे असे बहारदार वर्णन आलेले आहे. आधुनिकेतेपासून दूर असणा~या अशा ठाकरवाडीतील आदिवासींची पारंपारिक जीवनमुल्ये, त्यांची श्रद्धास्थाने यांचे दर्शन या गीतांमधून घडते.आदिवासींची धार्मिक प्रवृत्त्ती, त्यांची लीन्गोबादेवावरील श्रद्धा यात दिसते.
”चैत गेला
वैशाखाच उन गेलं बाई
पाऊसपाणी सरल,
सरली हंगामाची घाई
भात पिकल्या शेतावरले
पक्षी उडून जाई.”
या गीतातून निसर्गक्रमाने शेतीतील चैतन्य जाऊन दाणे संपल्यामुळे कसे नैराश्याचे वातावरण तयार होते ते स्पष्ट होते. भातापिकांचा हंगाम संपतो. पक्षी दूर जातात. त्यामुळे सर्वत्र कसा कोरडेपणा जाणवतो ते गीतातून स्पष्ट होते….
”गो-या देहावरती कांती
नागिणीची कात"
नायिकेचे तारुण्य ‘नागिणीची कात’ या प्रतिमेतून व्यक्त केले आहे.निसर्गाप्रतीमांच्या योजनेमुळे निसर्गाचे निस्सीम सौंदर्य दृष्टीस पडते.
"जांभूळ पिकल्या झाडाखाली
कोयड बोल बोलेजी”
किंवा
”नभ उतरू आलं
चिंब थर्थर ओल”
किंवा
”ह्या पंखांवरती
मी नभ पांघरती.”
या काव्य पंक्तीन्मधून ‘कोयड’, ‘नभ’ ह्या निसर्ग प्रतिमा नायकासाठी वापरलेल्या आहेत.निसर्ग प्रतिमांमधून नायक, नायीकांमधील प्रणय भावाचे दर्शन घडते.
चित्रपटातील गीतांमधून निसर्गाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी जमातीचे चित्रण आपणास आदिवासीन्च्या जवळ घेऊन जाते.
”चांदण्या गोंदून धरलिया झालर
आम्ही ठाकर ठाकर
ह्या रानाची पाखर.”
‘रानाची पाखर’ या निसर्ग प्रतिमेतून ठाकर समाजाची प्रतिमा उभी केलेली आहे.
” चैत गेला
वैशाखाच उन्ह गेलं बाई”
‘वैशाखाच उन्ह’ ही प्रतिमा दुख व्यक्त करण्यासाठी वापरलेली आहे.
आपणही आपल्या परिसरातील अशी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी गाणी, कथा, नाटके, ओव्या, लग्नगीते, शेतकरी गीते आपल्या या हक्काच्या व्यासपीठावर सादर करा व आपल्या संस्कृतीचा प्रसार व संवर्धन करा. पूर्वी लेखणी आम्हाला लाभली नाही…म्हणून आमचा क्रांतिकारी इतिहास डोंगर-द-यांत पडद्याआड गेला…….परंतु आज लेखणी आपल्या हातात आहे…..गरज आहे आपणच पुढाकार घेण्याची…..तर चला सुरुवात करा.
Lets Do It For Future
© Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment