आदिवासी आरोळी
एखादं कुत्र पुढच्या पायांवर जबडा ठेवून निपचित पडावं तसा आदिवासी समाजाचा विकास धोरणांमध्ये निपचित पडलाय……त्यात रानडूक्करांगत हैदोस घातलाय राजकीय ठेकेदारांनी…..तेव्हा रात्र वै-याची आहे असे समजून प्रत्येकाने जागृत राहून आदिवासी हितासाठी पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा आमच्या आया-बहिणी भविष्यात याच ठेकेदारांच्या वासनांधतेला बळी पडतील. त्यांचे भविष्यात बळी घेण्यापेक्षा आजच त्यांच्या नांग्या ठेचा….त्यासाठी प्रत्येकाने विचारांची लढाई लढली पाहिजे.@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
लोकांचा इकास हेरून आपलं पॉट दुखायच्या आत आपलं बी इकासचं धोरण असायला हवं उशाला…….तवां आपलं मत जरा इचार करून द्यावं बरका या वक्ताला….!!! कसंय परत त्ये पाच वरीस रडायले लावत्यात आपल्याला.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
कधी काळी सोन्याचा धूर निघणा-या देशात दोन वेळच्या रोजीरोटीसाठी ढुंगणाला पाय लावून माणसं काट्याकुट्यांतून पळताना पाहिली कि मला माझा भूतकाळ नाही तर भविष्यकाळ आठवतो………मी पारतंत्र्यात जगतोय आणि मला स्वातंत्र्य हवंय………राजकीय !!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
म्हणायला नुसते आम्ही सह्याद्रिचे राजे
एकरांचे होते मालक आमचे आजे
दुस-यांच्या विकासात जमिन गिळलि
आमच्या नशिबात चाकरी रुळलि !!!
चाकरी सोडून आम्ही मताचा करणार गजर
आम्हीच मालक करणार विकासाचा जागर
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
वेळच आता काळ बनलिय
आदिवासी विकास फक्त घोषणा बनलिय
पण आता मी रे आहे जागा
नक्कीच मी रे बनणार विकासाचा धागा !!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
जंगल फार बेस
मव्हा आदिवासी देस
जंगलच्या राजाचे वैभव परत मिळविन्यासाठी या वेळेस मी माझे ‘मत’ विकासाला देणार…!!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
माझे नाव विकास
तुझे नाव विकास
मत माझे ख़ास
निवडनार माझाच विकास
बाई-बाटलीचे राजकारण
गाडून साकारु समाजकारण
मताने नेक मी विकासाचा लेक
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आमच्याच समस्या आमचेच मरण
यावरच झाले आजपर्यंत राजकारण
माझे मत आखणार विकासाचा बेत
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
शहरात रस्ते चार चार पदरी
गावात आमच्या खड्डेच एक नंबरी
तिथेही माणसेच आम्हीही माणसं
जीवन भकास तरी नाव देती विकास
यावेळेस विकासाचा रस्ता निवडणार
माझे मत विकासालाच देणार !!!
जागो युवा भागो नहीं बदलो !
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
कधी धरण रचते आदिवासींचे सरण
तर कधी राज्यकर्त्यांची खुर्चीच बनते मरण
आत्ता वेळ आलीय जपा एकच धोरण
पैसा नको विकास हवा असे करा राजकारण !
जागो युवा भागो नहीं बदलो !
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
विजेचे खांब आदिवासिंच्या दारात
पण दारिद्र्याचा अंधार आदिवासिंच्या घरात
विज नाही तर मत बदल घडविणार
उज्ज्वल भविष्यासाठी योग्य व्यक्ति निवडणार !
जागो युवा भागो नहीं बदलो !
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
राज्यकर्त्यांना सत्तेची लालसा
म्हणून आदिवासींना केले खालसा
निर्णय आता आपल्याच मतात
पुनर्वसन करील त्याच्याच नशिबात
जागो युवा भागो नहीं बदलो !!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
0 comments :
Post a Comment