शूरवीर भागोजी नाईक…..
आद्य आदिवासी क्रांतिकारक….
नाशिक व नगर जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या वतीने राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला. शेतकर्यांकडून इंग्रज त्याकाळी शेतसारा वसूल करीत असत. त्यामुळे आदिवासी बांधव सरकारविरुद्ध नेहमी बंड करीत. याच काळात इंग्रजांनी आदिवासी समाजाचील युवकांची पोलीस दलात भरती सुरु केली. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे भागोजी नाईकही पोलीस दलात भरती झाला.
१८५७ च्या काळात भारतभर इंग्रजांविरुद्ध उठाव झाले. भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा, याबद्दल त्याला खेद वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिनार, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास दरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात करुन त्यांना मार्गदर्शन केले.
भागोजींनी ब्रिटीशांना ’सळो की पळो’ करुन सोडले. चास खिंडीत जेम्स हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४ Oct १८५१ रोजी ब्रिटीश अधिकारी हेन्री मारला गेला. त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकच्या मागावर होते.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ Nov १८५१ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८ क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले. नांदूरशिंगोटे येथे सुरु झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.
0 comments :
Post a Comment