आदिवासी एकी-काळाची गरज
अमेरिकेतील रेड इंडियन्स, ब्राझीलमधील कोगुई, अमेझॉन, फिलिपाइन्समधील बंटुक, कलिंग या आदिवासींना सुधारण्याच्या नावाखाली सशस्त्र टोळ्यांचा धाक दाखवून, दारूचे पाट वाहवून, रोगराईचा फैलाव करून, कर्जबाजारी करून जमिनी बळकावल्या. त्यांना निराधार केले व कित्येक वंश नष्ट केले. बांगला देशात सुमारे १२०० आदिवासींना घरात कोंडून सैनिकांनी जिवंत जाळले. इराकमध्ये कुर्दिश आदिवासींवर अशाच प्रकारचे दडपण अन्याय चालू आहेत.जगातील हे चित्र नीट अभ्यासा……एकी आणि सामाजिक जाणीव जागृतीची उणीव यामुळे जागतिक स्तरावरील अनेक आदिवासी जमाती आज संपुष्टात आल्या-आणल्या आहेत. उद्या ही वेळ भारतातील आदिवासींवर का येणार नाही? कारण आज आदिवासी भूमिहीन केला जातोय…..कुपोषणाच्या विळख्यात भावी पिढी खुडली जातेय……दर्जाहीन शिक्षणाने फक्त कारकून घडवले जात आहेत चाकरीसाठी………व्यसनांना खतपाणी घातले जात आहे……दवाखाने आलेत…पण डॉक्टर गायब आहेत….परिणामी आजारपणात अनेकांचा मृत्यू…..अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात आजचा आदिवासी अडकलेला आपणास दिसतोय. जगण्याच्या या चक्रव्युहातून बाहेर पडलेली शिक्षित मंडळी काही प्रमाणात स्वताला समाजापासून अलिप्त मानण्यात धन्यता मानत आहे. अशा परिस्थितीत सरकारी अन्याय असह्य झाल्याने अनेकजण अनीतीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याने नक्षलवादासारख्या समस्या वाढीस लागून त्यात आदिवासी समाज भरडला जातोय……नक्षलवाद काही प्रमाणात वाढू देणे आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण समाजच नष्ट करण्याचे कदाचित षडयंत्र असावे…….नाही तर देशासाठी आपला जीव ओवाळून टाकणारी आपली जंगलातील माणसे देशाच्या संरक्षणात पुढाकार घेणा-यांच्या विरोधात का उभी राहतील.
खरच खूप विचार केला कि खूप ताण वाढतो डोक्यात…..मग नीट उत्तरे नाही मिळाली कि मग जीवनाविषयी अनास्था वाढते….म्हणून अधिक विचार न करता आज सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा कधी दारू, तर कधी नक्षली कारवाया याच्या नावाखाली टिपून टिपून मारतील भाडखाऊ आपणास.
- Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment