आदिवासी साहित्य प्रकाशनासाठी कर्ज काढावे म्हटले तर तारण म्हणून त्यांना कवितांचे आख्खे पुस्तक देवू केले.
परंतु सावकार हुशार होता,
म्हटला
"पुस्तकाचं काय करू? त्याला तर आदिवासी पण नाही घेणार...."
मी म्हटलं विनंतीवजा,
"तुमचं नाव टाकतो संपादक म्हणून..."
सावकार पुन्हा हसला आणि हळूच म्हटला,
"तुझी जमीन दे...वेळेत पैसे नाही आले, तर विकता तरी येईल...जमीन घ्यायला आजकाल शहरातले आदिवासी पण लाखात किंमत मोजतात."
जे साहित्य ज्या मातीतून उगवलं, ती माती गहाण टाकण्याची वेळ आज आदिवासी साहित्यीकांवर आलेली आहे, त्यामुळे साहित्य बहारदार करावे की आपली जमीन बहारदार करावी अशा दुहेरी कात्रीत साहित्य अडकले आहे...
सावकारला दोष देण्याऐवजी मी माझ्या मनाला दुषणे देत बाहेर पडलो आणि सावकाराचा माझ्या जमीनीवर इतका डोळा का याचा विचार करू लागलो....
खरं तर त्याचं बोल काळजात घुसलं होतं...ज्या साहित्यात क्रांतीचे बीज असतात हे बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, भुजंग मेश्राम, गोविंद गारे यांनी दाखवून दिले, त्या साहित्याला पैशात तोलले जात आहे.
आज आदिवासी क्षेत्रात गरीब आदिवासींच्या जमीनी बिगर आदिवासींना घेता येत नाहित. परंतु शहरात बसलेले आमच्यातिल काही श्रीमंत आदिवासींनी भांडवलदारांची भूमिका बजावत गावाकडे शेतकरी बांधवान्च्या जमीनी बळकावायला सुरुवात केली आहे.
एकीकडे सरकार म्हणत आहे आदिवासींच्या जमीनी खुल्या करणार....त्याचे धोके लक्षात घेवुन आमच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ति(अपवाद म्हणून एखादी व्यक्ति) हे त्या विरोधात आवाज उठविण्याचा जोर धरत आहेत.
बिगर आदिवासी घेण्यापुर्वीच आदिवासी जमीनी बिगर आदिवासींच्या घशात घालण्याचे काम आमच्या काही सुशिक्षित वर्गाने केले आहे. आदिवासी जमीनी ह्या व्यक्ति स्वताच्या नावावर खरेदी करतात. नंतर 99 वर्षाच्या कराराने बिगर आदिवासींना व्यवसायासाठी देवून टाकतात. हे दलाल आज आमच्या जमिनिंवर नागोबा बनून समाजात वावरत आहेत.
साहित्य निर्मितीचा अभाव आणि दुरावत चाललेली वाचन संस्कृती त्यामुळे अशा दलालांचे अधिकच फावत आहे. यांचा धंदा इतका तेजित आहे की यांच्या विरोधात जर एखाद्याने आवाज उठविला तर त्याला सर्व बाजूंनी त्रास देण्याचे काम सुनियोजितपणे पार पाडले जाते.
कल मारनेवाले पराये थे
हमने धीरज से उनका सामना किया
आज मारनेवाले घर में है
हमारा धीरज उन्होंने दाँव पे लगा दिया
मरनेवाले हमारे लोग देखकर
वो अफसोस जताकर चले जाते है
जाते जाते मारनेवालों को
चंद तुकडे फ़ेंक देते है कुत्तो के जैसे
अब कौन साला मातम मनाए
उन्होंने हरदिन एक को मरते देखा है
चलती है साँसे फिर भी
मिट्टी की ममता में दिल मरता है
समाजाला बळ देण्यासाठी साहित्याला बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी साहित्याच्या प्रकाशनासाठी पुढे येण्याची गरज आहे. आदिवासी विचार फुलविण्यासाठी साहित्याच्या बागांना सर्वांनी पाणी, ख़त, ऊर्जा, मार्केट उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
-राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment