मरण....
कंद मुळे संपले
जल जंगल लुटले
आता जमिन हवीय
भुकेल्या पोटाची चिंताच मिटणार
चिता आमची पेटवायला
तुमचं भूमि अधिग्रहण येणार
जल जंगल लुटले
आता जमिन हवीय
भुकेल्या पोटाची चिंताच मिटणार
चिता आमची पेटवायला
तुमचं भूमि अधिग्रहण येणार
दरवर्षी बघायचो मी
सागाची पाने गळताना
दरवर्षी बघायचो मी
आमच्या झोपड्या जळताना
आता साग सारे तोडले
जळणासाठी पाचोळा नाही
खरं तर झोपड्याही संपतील
जाळायला आदिवासी उरणार नाही
सागाची पाने गळताना
दरवर्षी बघायचो मी
आमच्या झोपड्या जळताना
आता साग सारे तोडले
जळणासाठी पाचोळा नाही
खरं तर झोपड्याही संपतील
जाळायला आदिवासी उरणार नाही
अंधारात चांदणेही बघा
प्रकाश आम्हा दाखवत नाही
सत्तेच्या विरोधात जाऊन
त्यांनाही नियम पाळता येत नाही
दुःख विसरायला रात असायची
आता ती पण वै-याची झालीय
विकासाच्या ढिगा-यात आम्ही
असं किती दिवस गाडून घ्यायचं?
प्रकाश आम्हा दाखवत नाही
सत्तेच्या विरोधात जाऊन
त्यांनाही नियम पाळता येत नाही
दुःख विसरायला रात असायची
आता ती पण वै-याची झालीय
विकासाच्या ढिगा-यात आम्ही
असं किती दिवस गाडून घ्यायचं?
सागाच्या पानांगत नेहमीच
पानगळ म्हणून मातीत गाडायचं
आता तरी वीजा चमकू द्या
तंत्रज्ञान कुठं कमी पडतय
माझ्या जन्मावर नसेल
पण मरणावर तरी माझा हक्क द्या
तंत्रज्ञान कुठं कमी पडतय
माझ्या जन्मावर नसेल
पण मरणावर तरी माझा हक्क द्या
आजवर तुम्हीच मारत आलात
पार तुमच्या रामायणापासून
माणुसकीच्या लढाईत कितीदा
बळि म्हणून म्याच मरायचं
आता होवू द्या विद्रोह
साखळदंड तुटू द्या धर्माचे
मोकळा श्वास घेता आला म्हणजे
मग मी शांततेने मरायला मोकळा
-©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment