लोकशाहीची मुशाफिरी
माणुस का अचानक बदलला?
माणुसकिचा चेहरा हरवला
क्रांतिकारक वाटले आम्ही
इतिहास जात पाहून रेखाटला
माणुसकिचा चेहरा हरवला
क्रांतिकारक वाटले आम्ही
इतिहास जात पाहून रेखाटला
दाबला गळा श्रमिकांचा
धनिकांनी भ्रष्टाचार जोपासला
जन्मदात्री बेसहारा कशी ?
वृध्दाश्रमाचा आसरा गवसला
शेतातल्या घामाची फुले जळाली
घराच्या अंगणातली मुले पळाली
गंगेच्या प्रवाहाला प्रदूषणाचे ग्रहण
शाही स्नानासाठी सरकारी धोरण
घराच्या अंगणातली मुले पळाली
गंगेच्या प्रवाहाला प्रदूषणाचे ग्रहण
शाही स्नानासाठी सरकारी धोरण
वसंत ऋतूचा बहर कसा संपला
पानगळती विचारांची सुरु झाली
माझीच सावली आता मला
स्वस्थ बसु देत का नाही?
स्वस्थ बसु देत का नाही?
आत्महत्या करणा-या जीवांची
आम्ही जबाबदारी स्वीकारत नाही
एकाच देशातली माणसं आता
जातीसाठी भांडू लागली आहेत
स्वातंत्र्याची चादर ओढून कशी
लोकशाही मुशाफिरी करत आहे
आपलं फाटलेलं शिवायचं सोडून
जगाला अंगडं टोपडं करत आहे
-राजू ठोकळ
©www.rajuthokal.com
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment