हाक.....!
मंत्री नाही आम्ही निवडले दलाल
गरीबीवर आमच्या झाले मालामाल
गरीबीवर आमच्या झाले मालामाल
आता गाव राहिले नाही संपले जंगल
उपासमारी हटत नाही हरवले मंगल
आमचे नको गुण केला मातीचा बाजार
विकासाच्या नावानं आधुनिक आजार
विकासाच्या नावानं आधुनिक आजार
धरणात माय बुडाली बाप फाशीला उदार
कुपोषणाच्या नावानं तुमच्या तिजोरीला आधार
नाचणारी माणसं दीनवाणी केली तो सम्राट
राबणारे हात पसरती अब्रू पोटासाठी सपाट
राबणारे हात पसरती अब्रू पोटासाठी सपाट
जाग येईल केव्हा तोवर राजकीय थयथयाट
उलगुलानचा उभारा संघर्ष नाही तं नायनाट
माझं काय लोक काय म्हणतील इसरा हो
माझा समाज मोठा त्याची धरा कास आज हो
माझा समाज मोठा त्याची धरा कास आज हो
श्रीमंती संस्कारांची जरा जागवा विचार गड्या हो
मानवतेच्या रक्षणाला निसर्ग प्रेमाची हाक द्या हो
raju thokal
©www.rajuthokal.com
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment