पाखरांची शेती
दिस उगवला
हाती नांगर धरला
गाणं सर्जाचं ऐकत
तीनं दाणा पेरला
हाती नांगर धरला
गाणं सर्जाचं ऐकत
तीनं दाणा पेरला
मातीचं गुण
माणूस आनंदला
अंकुर पाहून
निसर्ग सुखावला
माणूस आनंदला
अंकुर पाहून
निसर्ग सुखावला
घामाचं चीज
कणगी धान्याला
जात्याची घरघर
भाकर धन्याला
कणगी धान्याला
जात्याची घरघर
भाकर धन्याला
ढेकळं सोबती
अनवाणी पायाला
ही पाखरांची शेती
या किलबिल ऐकायला
अनवाणी पायाला
ही पाखरांची शेती
या किलबिल ऐकायला
- Raajoo Thokal
0 comments :
Post a Comment