हार...!
बलात्कारीही सुटू लागलेत
खुनीही सुटू लावलेत
गरीबांसाठीच तुरुंग उरलेत
श्रीमंतांनी कायदेच बद्दललेत
निर्भया आमच्या घरात हर एक
वासनांध त्यांचे फिरती नेक
निष्पाप आमचे गजाआड लोक
कोणी करावा कायद्याचा धाक
न्याय शब्दाला आता वजन लागते
मोह मायेने सारं जग चालते
खुटीला संसार फाटकी गोधडी
तराजूत आमचं सर्वस्व हरवते
-राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment