पर्यावरणाचे धडे
आज पुन्हा तो पडला
खरंच बांधावर बसून
ढसाढसा रडला
घशाची कोरड ज्याला
खरंच भेगाळलेल्या जमिनीत
तहानलेल्यांसाठी पडला
पेटवतात पाणी धोरणी मेले
खरं तर दुष्काळ विचारांचा हाय
पर्यावरणाचे कोणी लचके तोडले
ज्यांनी तोडली झाडं
खरंच त्यांना शिकव धडा
पण पदरातलं पोटात जाऊ दे थोडं
जे बोंबलतात आमचं पाणी
खरं तर निसर्गाचे तेच गुन्हेगार
गा म्हणावं जरा निसर्गाची गाणी
काहींनी केलं आंदोलन
खरं तर त्यांना बागायताची काळजी
तहानलेल्या जीवांशी नसे मनोमिलन
पाणी ना यांच्या ना त्यांच्या बा'चं
ज्यांची गेली जमीन त्यांचं ते रक्त
विस्थापितांचं जग बघा आहे कोणाचं
आज तरी धरणात थोडं हाय
जंगलावरचं आक्रमण नाही रोखलं
तर भांडायला उरणार काय
तुमचीच आंदोलने तुमचेच लढे
निसर्ग पूजक देशोंधडीला
पर्यावरणाचे कोण गिरविल धडे?
-raju thokal
0 comments :
Post a Comment